breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

एसटीची दिवाळी सणातील हंगामी दरवाढ रद्द – अनिल परब

दरवर्षी प्रमाणे दिवाळी सुट्टीच्या कालावधीत केली जाणारी एसटीची हंगामी तिकीट दरवाढ यंदा कोविड -१९ च्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली आहे. प्रवाशांना प्रचलित तिकीट दरानुसार संपूर्ण दिवाळी सुट्ट्यांमध्ये प्रवास करता येणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी दिली आहे. दरवर्षी दिवाळी सुट्टीच्या कालावधीत सर्व बससेवा प्रकारासाठी १० ते १५ टक्केपर्यंत तिकीट दरवाढ करून अतिरिक्त महसूल प्राप्त करण्याचा प्रयत्न एसटी महामंडळाकडून करण्यात येत असे. मात्र यंदा कोविड – १९ च्या संकटात सर्वसामान्य प्रवाशांना अतिरिक्त आर्थिक भूर्दंड पडू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला, असे ते म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button