breaking-newsपुणेमहाराष्ट्र

एल्गार परिषदेप्रकरणी अटकेत असलेल्या शोमा सेन यांचा जामीन अर्ज फेटाळला

माओवाद्यांशी संबंध आणि एल्गार प्रकरणी अटक करण्यात आलेल्या  शोमा सेन यांचा जामीन अर्ज शुक्रवारी विशेष न्यायाधीश किशोर वढणे यांनी फेटाळून लावला. एल्गार परिषद प्रकरण आणि माओवाद्यांशी संबधित असल्याप्रकरणी वर्नन गोन्साल्विस, अ‍ॅड. सुधा भारद्वाज आणि अरुण परेरा यांचा जामीन अर्ज यापूर्वीच न्यायालयाने फेटाळून लावला. त्यानंतर  गोन्साल्विस, परेरा आणि अ‍ॅड. भारद्वाज यांना अटक करण्यात आली. तर त्यांना मागील आठवडय़ात 6 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

आता अ‍ॅड. सुरेंद्र गडलिंग यांच्या जामीन अर्जावर शनिवारी निर्णय होणार आहे. शुक्रवारी शोमा सेन यांचा जामीन अर्ज विशेष न्यायाधीश किशोर वढणे यांनी फेटाळून लावला. तसेच या सर्वांवर  देशाची एकता, एकात्मता, सुरक्षा, सार्वभौमात्वाला धक्का पोहचविण्याचे कृत्य केल्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

गडलिंग यांना उबदार कपडे मिळणार
अ‍ॅड. गडलिंग यांनी रंगीत पेन्सिल, रुमाल, पुस्तके, फोल्डर, बेडशीट या वस्तू मिळाव्यात असा अर्ज करण्यात आला होता. अर्जातील या विनंत्या मंजूर करण्यात आल्या आहेत. त्यांना काही उबदार कपडे देखील पुरविण्यात येणार आहे. त्याच बरोबर त्यांना जी पेन्सिल दिली जाणार आहे. तिला धार करण्यासाठी लागणारे शार्पनर हे कारागृह प्रशासनाकडे ठेवण्यात येणार आहे. ज्यावेळी गरज असणार तेव्हाच गडलिंग यांना दिले जाणार आहे असेही समजते आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button