breaking-newsआरोग्यताज्या घडामोडी

एलोवेरा जेवढं गुणकारी, तेवढंच अती सेवन हानिकारी…

एलो वेरा आपल्या घरामध्ये किंवा ऑफिसमध्ये कुठेही लावता येण्यासारखे असते. आजकाल एलो वेराचे आरोग्याच्या दृष्टीने फायदे आहेत…एलोवेरा रस, जेल अश्या अनेक प्रकारे लोक अॅलो वेराचा उपयोग करताना दिसत आहेत.

1…दात घासल्यानंतरही दातांमध्ये प्लाक किंवा किटाणू राहतातच. त्यामुळे तोंडामधून क्वचित दुर्गंधी येऊ लागते. ही दुर्गंधी येऊ नये यासाठी माऊथवॉश उपयोगात आणला जातो. अॅलो वेराच्या रसाचा वापर देखील प्राकृतिक माऊथवॉश म्हणून करता येतो. या रसामुळे तोंडातील प्लाक आणि किटाणू दूर होऊन दातांचे आरोग्य चांगले राहते. अॅलो वेराचा वापर माऊथवॉश म्हणून केल्याने हिरड्याही बळकट होतात.
2…कित्येकदा जेवण जास्त झाल्याने, जेवणाच्या वेळा गडबडल्याने किंवा जास्त तिखट, मसालेदार पदार्थ खाल्ल्याने छातीत जळजळ होत असल्याची भावना होते, किंवा अॅसिडीटी होते. अश्यावेळी अॅलो वराच्या रसाच्या सेवनाने फायदा होतो. या मुळे छातीतील जळजळ दूर होऊन अॅसिडीटी ही कमी होते. तसेच दररोज सकाळी रिकाम्या पोटी अॅलो वेराचा रस कोमट पाण्यातून घेतल्यास पोट साफ होण्यास मदत होते.
3..केस गळत असल्यास अॅलो वेराचा गर केसांना लावल्याने फायदा होतो. तसेच चेहऱ्यावर उष्णतेमुळे मुरुमे येत असल्यासही अॅलो वराच्या गराने फायदा होतो. या गराने त्वचेचा रंग उजळण्यास व पोत सुधारण्यास मदत होते. त्याचमुळे पुष्कळशा स्कीन क्रीम्समध्ये अॅलो वराच्या गराचा अंश मिसळलेला असतो. अॅलो वेराच्या गराच्या वापराने त्वचेवर आलेल्या सुकुत्याही कमी होतात, व त्वचा सुंदर दिसू लागते.

एलोवेराचं जास्त सेवन हानिकारक …
सकाळी उठल्यानंतर अॅलो व्हेराचा रस प्राशन करण नक्कीच चांगलं पण जास्त सेवनाने क्वचित शरीरावर दुष्परिणाम देखील दिसू येऊ शकतात. विशेषतः अॅलो व्हेराचे सेवन नव्याने करणाऱ्या व्यक्तींना याचे दुष्परिणाम जाणविण्याची शक्यता असते.

1…रिकाम्यापोटी अॅलो व्हेरा रसाचे सेवन केल्याने डीहायदड्रेशन होऊ शकते. बाजारामध्ये उपलब्ध असणाऱ्या अनेक पदार्थांमध्ये ही अॅलो व्हेराचा रस असतो. पण ह्याचे सेवन करताना काळजी घ्यावी. अॅलो व्हेराचा रस रेचक आहे. म्हणजेच यामध्ये लॅक्झेटिव्ह आहे. त्यामुळे ह्या रसाच्या सेवनानंतर वारंवार शौचाची भावना होण्याची शक्यता असते…
2…अॅलो व्हेरा जेलचा वापर त्वचेला आर्द्रता देण्यासाठी केल्याने क्वचित त्वचेवर पुरळ येऊ शकते, तसेच त्वचेला खाज सुटणे, त्वचेवर लाली येणे, अश्या तक्रारी उद्भवू शकतात.
3…ह्या रसाच्या वारंवार सेवनाने शरीरातील पोटॅशियमचे प्रमाण कमी झाल्याने अशक्तपणा जाणविण्याची शक्यता असते. तसेच हृदयाचे ठोके अनियमित पडणे, सतत थकवा अश्या तक्रारी उद्भवू शकतात. त्यामुळे या रसाचे सेवन केल्याने थोडी जरी अस्वस्थता जाणविली, तर ह्या रसाचे सेवन कमी करावे.अॅलो व्हेराच्या रसाच्या जास्त सेवनाने इरिटेबल बोवेल सिंड्रोमची तक्रार उद्भवू शकते….

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button