breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

एमआयडीसी परिसरात ऍप बेस्ड सायकल शेअरिंग

पिंपरी – पिंपरी-चिंचवडमधील एमआयडीसी परिसरात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अंतर्गत ये-जा करण्यासाठी बस, रिक्षाची सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या भागात जाणे सहज शक्‍य व्हावे, यासाठी प्रथमच ऍप बेस्ड शेअरिंग सायकलचा प्रयोग राबवण्यात येणार आहे. येत्या दोन महिन्यांत या उपक्रमाला सुरवात होणार आहे.

एमआयडीसी परिसरात मोठ्या प्रमाणात कामगार, महिला, महाविद्यालयीन विद्यार्थी येत असतात. त्यासाठी हा प्रयोग राबवण्यात येणार आहे. रिक्षा आणि बससाठी मोजाव्या लागणाऱ्या पैशांपेक्षा हा उपक्रम अधिक किफायतशीर ठरणार आहे.

सायकलचा प्रयोग राबवताना कर्मचाऱ्यांना मासिक पासची योजना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या भागातील 76 किलोमीटर अंतरावर हा उपक्रम राबवण्यात येणार असून, त्यासाठी 20 ठिकाणी सायकल स्टॅन्ड करण्यात येणार आहेत. सायकल उपलब्ध करून देण्यासाठी चार कंपन्यांबरोबर बोलणी सुरू आहे. येत्या काही दिवसांमध्ये त्याला अंतिम स्वरूप देण्यात येईल.

येथे मिळणार सायकल 

  • इलेक्‍ट्रॉनिक सदन
  • एमएसआरटीसी जनरल ब्लॉक, एस ब्लॉक
  • जे-डब्लू ब्लॉक, इंद्रायणीनगर
  • चेंबर ऑफ कॉमर्सचे ऑफिस, जे ब्लॉक
  • टेल्को मटेरियल, ए 2 ब्लॉक
  • टी. ब्लॉक
  • केएसबी चौक, डी ब्लॉक
  • फिनोलेक्‍स चौक, एमआयडीसीजवळ
  • कायनेटिक चौक ,डी ब्लॉक
  • खंडोबामाळ, एच ब्लॉक, आकुर्डी
  • हॉस्पिटल, थरमॅक्‍स चौक
  • एफ 2 ब्लॉक

पिंपरी-चिंचवड एमआयडीसी भागात गेल्या 45 वर्षांत अंतर्गत बस वाहतूक व्यवस्था नाही. त्यामुळे या भागातील कर्मचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. ऍप बेस्ड सायकल शेअरिंगचा प्रयोग या ठिकाणी यशस्वी होईल. त्यामुळे हा उपक्रम लवकर सुरू करण्यात येणार आहे. सायकलींची मागणी वाढल्यानंतर त्यामध्ये वाढ करण्यात येईल. 
– अभय भोर, अध्यक्ष, फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button