breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

एनसीबी अधिकारी समीर वानखेडेंच्या तब्येतीबाबत पत्नी क्रांती रेडकरची माहिती

मुंबई – नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी)चे अधिकारी समीर वानखेडे यांच्यासह त्यांच्या टीमवर गोरेगावमध्ये ड्रग्ज पेडलर्सनी हल्ला केला होता. या हल्ल्यात वानखेडेंसह दोन अधिकारी जखमी झाले होते. मात्र आता समीर वानखेडे यांची तब्येत ठिक असल्याची माहिती त्यांची पत्नी अभिनेत्री आणि दिग्दर्शिका क्रांती रेडकर हिने दिली आहे.

क्रांतीने इंस्टाग्राम पोस्ट शेअर करून म्हटलंय, ‘समीर हे ठिक आहेत. आम्ही त्यांच्यासोबत घरी आहोत. नार्कोटिक्सच्या टीमला मोठा सॅलूट जे ड्रग्ज कनेक्शनच्या विरोधात उभे ठाकलेयत. आम्हाला तुमच्यावर गर्व आहे.’

समीर वानखेडे हे एनसीबीचे विभागीय संचालक आहेत. सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात समोर आलेल्या बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शनप्रकरणी त्यांनी अनेक तारे-तारकांवर कारवाई केली होती. सोमवारी सायंकाळी ते मुंबईतल्या गोरेगाव भागात कैरी मेंडिस नावाच्या व्यक्तीला पकडण्यास गेलेले असताना त्यांच्यावर हा हल्ला झाला. एकूण पाच अधिकाऱ्यांचे पथक या कारवाईसाठी गेले होते. यावेळी ड्रग्ज पेडलर्सच्या ५० ते ६० जणांच्या घोळक्याने एनसीबीच्या अधिकाऱ्यांवर हल्ला केला होता. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून पुढील चौकशी सुरू आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button