breaking-newsराष्ट्रिय

एनआयएचे १६ ठिकाणी छापे, आयसिसचा मोठा कट उधळला

राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) दिल्ली आणि उत्तर प्रदेशमधील विविध १६ ठिकाणी छापे टाकून आयसिस या दहशतवादी संघटनेच्या नव्या मॉड्यूलचा खुलासा झाला आहे. एनआयएला मोठा मोठा कट उधळण्यात यश आले आहे. याप्रकरणी ५ जणांना ताब्यातही घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात स्फोटके जप्त केल्याचा दावा केला जात आहे. माध्यमांत आलेल्या वृत्तानुसार संशयित आरोपींकडून दहशतवादी कृत्य करण्याचा कट रचण्यात आला होता.

ANI

@ANI

NIA: Conducting searches at 16 locations in Uttar Pradesh and Delhi in connection with a new ISIS module styled as ‘Harkat ul Harb e Islam’

३४७ लोक याविषयी बोलत आहेत

दिल्लीतील जाफराबाद आणि उत्तर प्रदेशातील अमरोहा येथील १६ ठिकाणी छापे टाकण्यात आले. या छाप्यात एनआयए आणि एटीएसने संयुक्त कारवाई केली. या छाप्यात आयसिसचे नवे मॉड्यूल हरकत-उल-हर्ब-इस्लामचा खुलासा झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

View image on TwitterView image on TwitterView image on Twitter

ANI UP

@ANINewsUP

Visuals from Amroha where NIA is conducting searches in connection with a new ISIS module styled as ‘Harkat ul Harb e Islam’. Searches are underway at 16 locations in Uttar Pradesh and Delhi.

१४१ लोक याविषयी बोलत आहेत

अमरोहा येथील सैदपूरमधील इम्मा गावातही एका ठिकाणी छापा टाकण्यात आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button