breaking-newsटेक -तंत्रताज्या घडामोडी

एकाचवेळी तब्बल 250 जणांसोबत ‘फ्री’मध्ये करता येणार ‘Video Conferencing’

करोना व्हायरसमुळे लॉकडाउन असल्याने घरबसल्या व्हिडिओ कॉलिंग फीचर असलेल्या अ‍ॅप्सचा वापर मोठ्या प्रमाणात वाढलाय. अशातच आता Google ने आपले व्हिडिओ कॉन्फरन्सिंग अ‍ॅप Google Meet सर्व युजर्ससाठी मोफत उपलब्ध केलंय. आतापर्यंत हे अ‍ॅप केवळ G Suite च्या ग्राहकांसाठी उपलब्ध होतं. त्यासाठीही पैसे आकारले जायचे. पण आता हे अ‍ॅप मोफत उपलब्ध करण्यात आलं आहे.

या अ‍ॅपची खासियत म्हणजे याद्वारे एकाचवेळी तब्बल 250 जणांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंग करता येणे शक्य आहे. आतापर्यंत हे अ‍ॅप G Suite च्या माध्यमातून केवळ व्यावसायिक आणि शैक्षणिक उपक्रमांसाठी उपलब्ध होते. पण, २९ एप्रिलपासून पहिल्यांदाच हे Google Meet हे अ‍ॅप गुगल अकाउंट असलेल्या सर्व युजर्ससाठी उपलब्ध झालं आहे. ट्विटरद्वारे कंपनीने याबाबत माहिती दिली आहे. दररोज जवळपास ३० लाखांहून अधिक युजर्स या अ‍ॅपशी जोडले जात असल्याचंही कंपनीने सांगितले. टप्प्याटप्प्यात याची सुरूवात झाली असून काही आठवड्यांमध्ये देशभरात ‘फ्री’ फीचर रोलआउट केले जाईल.

गुगलने यासाठी एक ‘नोटिफाय मी’ पेज तयार केले आहे. या पेजवर आपली माहिती शेअर केल्यानंतर तुम्हाला कधीपर्यंत Google Meet ची सेवा मिळेल याबाबत सूचना मिळेल. वेब अ‍ॅक्सेसशिवाय iOS युजर्स आणि अँड्रॉइड या दोन्ही युजर्ससाठी हे अ‍ॅप उपलब्ध असेल असे कंपनीने स्पष्ट केले आहे. पण, ही मोफत सेवा केवळ 30 सप्टेंबरपर्यंतच असेल. त्यानंतर मिटिंगची वेळमर्यादा ६० मिनिटांपर्यंत सेट केली जाईल. G Suite Essentials मध्ये मिळणाऱ्या डायल-इन फोन नंबर, मिटिंग रेकॉर्डिंग हे सर्व फीचर्स युजर्ससाठी 30 सप्टेंबरपर्यंत मोफत असणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button