breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

उपमुख्यमंत्री अजित पवार कोरोना पॉझिटिव्ह; ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

मुंबई | प्रतिनिधी

गेल्या काही दिवसांपासून क्वारंटाइनमध्ये असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना आज मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

अजित पवार यांना कोरोनाची लागण झाल्याचं निदान झाल्यानंतर रुग्णालयात हलवण्यात आले. अतिवृष्टी झालेल्या भागाचा दौरा केल्यानंतर अजित पवार यांना थकवा जाणवू लागला होता. त्यानंतर ते डॉक्टरांच्या सल्ल्याने स्वतः क्वारंटाइनमध्ये होते.

मागील आठवड्यात अजित पवार सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यानंतर त्यांचा प्रदेश कार्यालयात जनता दरबार होणार होता. मात्र, तो रद्द करण्यात आला होता. त्यानंतर अजित पवार यांची प्रकृती बरी नसल्याचं समोर आलं होतं. मात्र, कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याचंही स्पष्ट करण्यात आलं होतं. मात्र, सोमवारी त्यांना डॉक्टरांच्या सल्ल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

“माझी कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली असून, प्रकृती उत्तम आहे. सावधतेचा उपाय म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल झालो आहे. राज्यातील नागरिक, राष्ट्रवादी काँग्रेसह राज्यातील सर्व राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांना विनंती आहे की, काळजी करण्याचे काहीही कारण नाही. माझी प्रकृती उत्तम असून, थोड्याशा विश्रांतीनंतर मी लवकरच आपल्यासोबत असेन,” असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button