breaking-newsTOP Newsपिंपरी / चिंचवड

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून चक्क पहाटे मेट्रोच्या कामाची पाहणी

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पुणेकर साखरझोपेत असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुणे मेट्रोच्या भूयारी कामाची पाहणी केली. त्यासाठी ते सकाळी पावणे सहा वाजताच्या सुमारास पुणे स्टेशन येथील मेट्रो कामाच्या ठिकाणी पोहचले. अजित पवार यांच्या येण्याने मेट्रो अधिकाऱ्यांची मात्र तारांबळ उडाली.

पुण्यामध्ये पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या दोन मार्गांचे काम महामेट्रोकडून सुरू आहे. यातील पुणे स्टेशन येथील सुरू असलेल्या कामाची माहिती अजित पवार यांनी घेतली. दरम्यान, अजित पवार येणार म्हटल्यावर मेट्रोचे अधिकारी उपस्थित होते.

पवार यांनी आज पुणे स्टेशन, व्हील पार्क डेपो (वनाज), शिवाजीनगर कृषी महाविद्यालय येथे पाहणी केली. यावेळी महाराष्ट्र मेट्रो रेल कार्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी मेट्रोच्या सुरू असलेल्या कामाबाबत सविस्तर माहीती दिली. शिवाजीनगर येथे मॉडेल ट्रेनने प्रवास केला. शिवाजीनगर येथील बोगदा काम, व्हील पार्क (वानज) येथील कचरा डेपोचे अत्याधुनिक मेट्रो डेपोमध्ये रूपांतर केले आहे. येथील कामाचीही त्यांनी पाहणी केली. मेट्रोच्या रेणू गेरा यांनी या मेट्रो डेपो उभारणीबाबत सविस्तर माहिती दिली.

कोरोना संकट काळात मेट्रो काम बंद होते. आता कामगार संख्या सुद्धा कमी आहे. त्यामुळे अजित पवार यांनी यावेळी मेट्रो प्रकल्पाचे काम कशा पद्धतीने सुरू आहे, स्टेशन कशी असणार, पुणे मेट्रोसाठी सर्व जागा संपादित आहे का ? याची पाहणी केली. सध्या कामगारांचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण होऊ शकणार नाहीत, असे असताना या कामाला गती कशी देता येईल याविषयी अजित पवार यांनी मेट्रो अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button