पुणे

उन्हाळ्यामुळे सर्वच भाज्यांची आवक घटली

शेवगा, गाजर, भेंडी, फ्लॉवर, कोबी, सिमला मिरची, हिरव्या मिरची महागली
पुणे, (प्रतिनिधी) – गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील तरकारी विभागात भाज्यांची आवक गेल्या आठवड्याच्या तुलनेत घटली आहे. त्यामुळे शेवगा, गाजर, भेंडी, फ्लॉवर, कोबी, सिमला मिरची आणि हिरव्या मिरचीच्या भावात सुमारे 10 ते 20 टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. उर्वरित सर्व प्रकारच्या भाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापारी विलास भुजबळ यांनी दिली.
रविवारी येथील बाजारात 140 ट्रक इतकी आवक झाली आहे. त्यामध्ये परराज्यातून आलेल्या मालामध्ये हिमाचल प्रदेश येथून मटारची 2 ट्रक, गुजरात आणि कर्नाटक येथून कोबीची 6 ते 7 ट्रक, कर्नाटक येथून तोतापुरी कैरी 7 ते 8 टेम्पो, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू येथून शेवगा 3 ते 4 टेम्पो, इंदौर येथून गाजर 5 ते 6 टेम्पो, गुजरात आणि कर्नाटक येथून 10 ते 12 टेम्पो हिरवी मिरची, तर स्थानिक पुणे विभागातून सातारी आले 1400 ते 1500 गोणी, टोमॅटो साडे-पाच ते सहा हजार पेटी, फ्लॉवर 14 ते 15 टेम्पो, कोबीची 10 ते 12 टेम्पो, ढोबळी मिरचीची 08 ते 10 टेम्पो, हिरव्या मिरचीची 3 ते 4 टेम्पो, तांबडा भोपळा 10 ते 12 टेम्पो, गावरान कैरी 14 ते 15 टेम्पो, चिंच 25 ते 30 पोती, भुईमूग शेंगांची 200 ते 250 पोती इतकी आवक झाली. याशिवाय कांद्याची 80 ट्रक, इंदौर, आग्रा आणि गुजरात येथून बटाट्याची 60 ते 65 ट्रक, मध्य प्रदेश आणि गुजरात येथून लसणाची साडे-पाच ते सहा हजार गोण्यांची आवक झाली.
फळभाज्यांचे दहा किलोचे भाव:  कांदा : 40-65, बटाटा : 60-100, लसूण : 300-650, आले सातारी : 100-160, भेंडी : 200-300, गवार : 200-300, टोमॅटो : 50-70, दोडका : 300-400, हिरवी मिरची : 300-400, दुधी भोपळा : 80-140, चवळी : 200-300, काकडी : 80-120, कारली : हिरवी 300-350, पांढरी : 200-250, पापडी : 250-300, पडवळ : 180-200, फ्लॉवर : 100-140, कोबी : 140-160, वांगी : 100-200, डिंगरी : 150-200, नवलकोल : 140-150, ढोबळी मिरची : 220-250, तोंडली : कळी 150- 200, जाड : 90-100, शेवगा :250-300, गाजर : परराज्य : 150-160, स्थानिक : 300 – 350, वालवर : 250-300, बीट : 150- 200, घेवडा : 800-1000, कोहळा : 150-200, आर्वी: 200-300, घोसावळे : 180-200, ढेमसे : 100-200, भुईमूग शेंग : 250-350, मटार : परराज्य : 600-650, पावटा : 550-600, तांबडा भोपळा : 60-120, कैरी : तोतापुरी : 120-160, गावरान: 80-160. चिंच (अखंड) : 300-400, सुरण : 280-300, मका कणीस : 50-80, नारळ (शेकडा) : 1000-1600.
पालेभाज्यांचे शेकडा जुडीचे भाव
कोथिंबीर : 400-1000, मेथी :800-1200, शेपू : 800-1000, कांदापात : 800-1000, चाकवत : 500-600, करडई : 500-600, पुदिना : 200-300, अंबाडी : 600-700, मुळे : 1000-1200, राजगिरा : 400-500, चुका : 700-800, चवळई : 400-600, पालक : 800-1200.
पालेभाज्यांच्या दरात वाढ
उन्हाळ्यामुळे पालेभाज्यांची आवक घटली आहे. त्या तुलनेत पालेभाज्यांना मागणी वाढली आहे. त्यामुळे मेथी, शेपू, मुळा आणि पालकच्या दरात सुमारे 20 टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. उर्वरित पालेभाज्यांचे दर गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहेत. रविवारी गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील तरकारी विभागात कोथिंबिरीची दीड लाख जुड्या, तर मेथीची तीस हजार जुडींची आवक झाली आहे. बाजारात आवक झालेल्या मालामध्ये खराब मालाचे प्रमाण अधिक आहे. दर्जेदार मालाला चांगला दर मिळत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button