breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

उन्नती सोशल फाउंडेशनच्या रक्तदान शिबिरात ९६ रक्तदात्यांचा सहभाग

पिंपरी । प्रतिनिधी

पिंपळे सौदागर येथील उन्नती सोशल फाउंडेशनच्या वतीने शिवजयंती निमित्त रक्तदान शिबिर व मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. यामध्ये ९६ रक्तदात्यांनी सहभाग नोंदविला. तसेच ५० ज्येष्ठ नागरीकांनी मोफत आरोग्य तपासणी शिबीरामध्ये सहभाग नोंदवला.

या वेळी नवचैतन्य क्रीडा प्रतिष्ठान अध्यक्ष प्रसाद कुंजीर, क्रांती मित्र मंडळ अध्यक्ष स्वप्नील काटे, काळभैरवनाथ कब्बडी संघ रहाटणी अध्यक्ष आदिनाथ नखाते, महाराष्ट्र कब्बडी संघ रहाटणी अध्यक्ष अमित नखाते या मंडळाच्या अध्यक्ष व सभासदांच्या हस्ते उदघाटन व शिबिराची सुरुवात करण्यात आली.

या वेळी उन्नती सोशल फाऊन्डेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे ,संस्थापक संजय भिसे, नगरसेवक शत्रुघ्न काटे,पवना बँकेचे उपाध्यक्ष जयनाथ काटे, स्वराज नागरी पतसंस्थेचे संस्थापक/ अध्यक्ष सुनील कुंजीर, पि. के. स्कूलचे संस्थापक जगन्नाथ काटे, सामाजिक कार्यकर्ते शंकर चोंधे, उद्योजक राजू भिसे, उमेश शेलार, विजयकांत डुरे ,अतुल पाटील, रोहिदास गवारी, राजेंद्र जयस्वाल , विकास काटे, प्रसाद कुंजीर, यांचा हस्ते दिपप्रज्वलन करन्यात आले .त्यावेळी नगरसेविका निर्मला कुटे ,कुंदन झिंजुर्डे, राजू शेलार,गौरी कुटे, विठाई मोफत वाचनालयातील सर्व सभासद व इतर नागरिक उपस्थित होते. अजिंक्य भिसे स्पोर्ट्स फाउंडेशन यांचे सभासदही हजर होते .

या वेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना कुंदा भिसे म्हणाल्या, सध्या कोरोना महामारीचा कार्यकाळ सुरु आहे. अनेक रुग्णांना रक्ताची गरज असते. त्यामुळे शिवजयंती निमीत्त रक्त संकलन करण्याचे ठरविले. त्याला परिसरातील अनेक नागरिकांनी साथ दिली. या शिबिरात ९६ बॉटल रक्त संकलित करू शकलो. नागरिकांनी सामाजिक उपक्रम राबविताना समाजाला उपयोग होईल असे कार्यक्रम राबवावीत असे वाटते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button