TOP NewsUncategorizedताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

उधारी द्या, अन्यथा चहा, नाश्ता बंद; मंत्र्यांकडील वसुलीसाठी मंत्रालयात परिपत्रक

सध्या मुंबई येथील मंत्रालयात लावलेले एक परिपत्रकाची चांगलच चर्चा होत आहे. हे परिपत्रक आहे उपहारगृहाच्या थकीत उधारीसंदर्भातील. होय, मुख्यमंत्री, मंत्री, राज्यमंत्री, सचिव कार्यालयाची खाण्यापिण्याची उधारी एवढी झाली का शेवटी शासनाला परिपत्रक काढावे लागले. आता थकबाकी असलेल्या कार्यालयांना केवळ आठ दिवसाचीच उधारी मिळणार आहे.

राज्याच्या मंत्रालयातील सरकारी उपाहारगृहांची अधिकारी तसेच विविध कार्यालयांत उधारी अडकली आहे. यासंदर्भात सामान्य प्रशासन विभागाने परिपत्रकच काढले असून आठवडाभरात उधारी द्या, अन्यथा चहा, नाश्ता यापुढे पुरवणे शक्य होणार नाही, असा इशारा दिला आहे. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या या उपाहारगृहाला अनुदान देण्यात येते.

मुख्य सचिव, त्या त्या विभागाचे सचिव, सहसचिव आणि उपसचिव यांचे शेकडो कार्यालये मंत्रालयात आहेत. या विविध विभाग, अधिकारी तसेच मंत्री कार्यालयांना चहा तसेच नाश्ता पोहोचवला जातो. मंत्री महोदय आणि सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे जेव्हा बैठका असतात, तेव्हा सरकारी उपाहारगृह खानपान सेवा पुरवते. त्याची देयके नंतर त्या त्या विभागांनी चुकती करायची असतात.

उपहारगृह हे सामान्य प्रशासन विभागाकडून चालवले जाते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button