breaking-newsताज्या घडामोडीपुणे

उद्योगनगरीत ग्रंथालयाची वानवा

पिंपरी : पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीची वाटचाल सांस्कृतिकनगरीकडे सुरू आहे. मात्र, ३५ वर्षांच्या वाटचालीत वाचनसंस्कृती या शहरात रुजलेली नाही. शहरात ग्रंथालयांची वानवा आणि प्रकाशन संस्थांची कमतरता आहे. डिजिटल ग्रंथालये आणि फिरती वाचनालये सुरू करायला हवीत. गाव ते महानगर आणि महानगर ते स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू आहे.

शहरात पायाभूत सुविधांच्या दृष्टीने शहर स्मार्ट झाले असले, तरी साहित्यिक, वैचारिक दृष्टीने ओळख निर्माण करण्याची गरज आहे. मैदाने, रस्ते, नाट्यगृहे वाढत असताना वाचनसंस्कृती वाढीस लागण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. शहराची लोकसंख्या २२ लाखांवर पोहोचली आहे. मात्र, वाचनालये आणि ग्रंथालयांची संख्या अत्यल्प आहे. शहरात महापालिकेची आणि खासगी अशी एकूण २४ वाचनालये, ग्रंथालये आहेत.
खासगी ग्रंथालयांचीही संख्या कमी आहे. वाचनसंस्कृती वाढविण्यासाठी महापालिका, तसेच विविध संस्थांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. पुण्याचे जुळे शहर म्हणून शहराची ओळख असल्याने अजूनही पुण्याएवढ्या प्रशस्त आणि अत्याधुनिक ग्रंथालयांचा अभाव आहे. तसेच पुस्तकनिर्मितीचे प्रमाणही कमी आहे. तसेच बहुतांश प्रकाशक हे पुस्तकनिर्मितीची कामे पुण्यातूनच करवून घेतात. शहरात पुस्तक निर्मितीच्या संस्था वाढायला हव्यात. डिजिटल ग्रंथालयांचीही वानवा शहरात आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button