पुणे

उद्योगनगरीच्या सर्वांगीण विकासासाठी ‘दुवा’

– भोसरीत दिमाखदार ‘जश्न-ए-ईद-मिलन’ 
– आमदार महेश लांडगे यांचे संयोजन
भोसरी- अस्सलाम अलैकूम… वालेकूम अस्सलाम… आओ गले मिलो… ईद मुबारक… ईद उल फित्र अर्थातच रमजान ईदनिमित्त भोसरीतील कै. अंकुशराव लांगडे सभागृहात सर्वधर्मीयांडून एकमेकांना शुभेच्छा देण्यात आल्या. निमित्त होते आमदार महेश लांडगे यांनी संयोजित केलेल्या ‘जश्न-ए-ईद-मिलन’ कार्यक्रमाचे…यावेळी जमलेल्या तमाम मुस्लिम बांधवांनी ‘उद्योगनगरी’तील शांतता, सलोखा, समृद्धी आणि विकासासाठी ‘दुवा’ मागितली.
भोसरी येथील कै. अंकुशराव लांडगे सभागृहात रविवारी सायंकाळी ‘जश्न-ए-ईद-मिलन’चा दिमाखदार कार्यक्रम झाला. यावेळी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट, समाज कल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे, महापौर नितीन काळजे, आमदार लक्ष्मण जगताप, सभागृह नेते एकनाथ पवार यांच्यासह नगरसेवक पदाधिकारी-कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी महापौर आझम पानसरे होते. कार्यक्रमाचे आयोजन भाईजान काझी यांनी केले. यावेळी सुलतान नाझॉं कव्‍वाल यांच्या कव्‍वालीचा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाला आलेल्या सर्वांचे गुलाबपुष्प देवून स्वागत करण्यात आले. सामिष भोजनासह शिरखुर्म्याचा बेतही आखला होता.
पालकमंत्री बापट म्हणाले की, रमजान हा पवित्र महिना मानला जातो. या महिन्यात मागितलेली ‘दुवा’ मान्य होते. या पवित्र महिन्यात उपवास करून अल्लाहचा आशीर्वाद प्राप्त होतो. देशाच्या प्रगतीसाठी तसेच सर्वांच्या कल्याणासाठी मुस्लिम बांधवांनी शिक्षणात प्रगती केली पाहिजे, अशी भावना व्यक्त केली. जाती-धर्माच्या अगोदर आपण माणूस आहोत. याची जाणीव आपण ठेवली पाहिजे. आपल्या सर्वांनी केलेली ‘दुवा’ कबूल होऊन देशाची उत्तमोत्तम प्रगती होत राहील. जातीय सलोख्यासह आनंदाने एकमेकांच्या सहकार्याने देशाची प्रगती करणे, ही या देशाची शान आहे, असेही पालकमंत्री बापट यावेळी म्हणाले.
—————–
सर्वांनासोबत घेणारा नेता…
पुण्यात सर्वांनासोबत घेऊन सर्वांचा विकास करण्याची ताकद असलेला लोकप्रतिनिधी म्हणून पालकमंत्री गिरीश बापट यांनी काम केले आहे. त्यांच्या नेतृत्त्वाखाली आता पिंपरी-चिंचवडमधील विविध विकासप्रकल्प मार्गी लागणार आहेत. शहरातील पायाभूत सोयी-सुविधा आणि सर्वसामान्य नागरिकांच्या अपेक्षांची जाण असलेला पालकमंत्री आम्हाला लाभला आहे, असे मत यावेळी कार्यक्रमाचे आयोजक भाईजान काझी यांनी व्यक्त केले.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button