breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

उद्या मुंबईतील सात विभागांचा पाणीपुरवठा बंद

मुंबई – उद्या ११ नोव्हेंबर रोजी मुंबईतील काही ठिकाणचा पाणीपुरवठा बंद राहणार असून १२ नोव्हेंबर रोजी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. त्यामुळे पाणी जपून वापरावे, असे आवाहन मुंबई महापालिकेकडून नागरिकांना करण्यात आले आहे. दरम्यान, जलवाहिनी दुरुस्तीच्या कामासाठी उद्या सकाळी 10 ते रात्री 8 दरम्यान पाणी पुरवठा बंद राहिल.

मुंबई महानगरपालिकेतर्फे 1800 मिमी व्‍यासाच्‍या मुख्‍य जलवाहिनीमध्ये सुमननगर जंक्‍शनजवळ गळती झाल्याचे आढळून आले होते. ही गळती बंद करण्‍याचे काम उद्या हाती घेण्‍यात येणार आहे. त्यामुळे महापालिकेच्या सात विभागांमधील काही परिसरात पाणीपुरवठा बंद राहिल. तसेच १२ नोव्हेंबर रोजी काही विभागात पाणीपुरवठा कमी दाबाने होईल. त्यामुळे या दोन्ही दिवशी पाणी गाळून आणि उकळून प्‍यावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

त्याचबरोबर नागरिकांनी आज आणि उद्या पाण्‍याचा साठा करुन ठेवावा आणि पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत पाण्याचा जपून वापर करावा, असेही महापालिकेकडून सांगण्यात आले आहे.

उद्या ‘या’ विभागांत पाणी येणार नाही
एम पूर्व : ट्रॉंबे निम्‍नस्‍तर जलाशयावरील सी.जी. गिडवाणी मार्ग, रामकृष्‍ण चेंबूरकर मार्ग, सह्याद्री नगर, कस्‍तुरबा नगर, अजिज बाग, अयोध्‍या नगर, म्‍हाडा कॉलनी, भारत नगर, आणिक गाव, विष्‍णू नगर, प्रयागनगर आणि गवाण पाडा

एम पश्चिम : साई बाबा नगर, शेल कॉलनी, सिध्‍दार्थ कॉलनी, पोस्‍टल कॉलनी, एचपीसीएल, बीपीसीएल, आरसीएफ, बीपीटी, टाटा पावर, रामकृष्‍ण चेंबूरकर मार्गावरील मारवाली चर्च, आंबापाडा, माहूल गाव, म्‍हैसुर कॉलनी, वाशी गाव, माहूल पीएपी, मुकुंद नगर एसआरए, लक्ष्‍मी नगर, कलेक्‍टर कॉलनी, सिंधी सोसायटी, चेंबुर कॅंम्‍प तसेच चेंबुर नाका ते सुमननगर मधील सायन-ट्रॉबे मार्गालगतचा भाग

एफ दक्षिण : परळ गाव, शिवडी पश्चिम आणि पूर्व, हॉस्पिटल झोन, काळे वाडी

एफ उत्तर : कोकरी आगार, ऍन्टोपहील, वडाळा, गेट क्र. ४, कोरबा मिठागर, बीपीटी

बी विभाग : डोंगरी ए झोन, वाडी बंदर, सेंन्‍ट्रल रेल्‍वे झोन, बीपीटी झोन

ई विभाग : डॉकयार्ड झोन, हाथीबाग व हुसैन पटेल मार्ग आणि माऊंट रोड झोन, जे.जे. हॉस्पिटल

ए विभाग : नेवल डॉक आऊटलेट झोन, सेंट जॉर्ज हॉस्पिटल

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button