breaking-newsपिंपरी / चिंचवड

उत्तर भारतीयांच्या श्रीराम मंदिराचा वर्धापनदिन उत्साहात, अजित पवार यांची उपस्थिती

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – भोसरी एमआयडीसी येथील श्रीराम पंचायटन ट्रस्टव्दारा संचालित श्री राम मंदिर चौथ्या वर्धापनदिनानिमित्त विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. अजितदादाच्या हस्ते पूजा आरती करण्यात आली. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष इंद्रमन सिंह यांच्या हस्ते अजित पवार यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी भोसरीचे माजी आमदार विलास लांडे, आमदार महेश लांडगे, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे विरोधी पक्षनेते दत्ता साने, स्थायी समिती सभापती विलास मडेगिरी, नगरसेवक संजय वाबळे, विक्रांत लांडे, जगदिश शेट्टी, गोपी धावडे, प्रकाश सोमवंशी, सोनाली गव्हाने आदी मान्यवर उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असताना पिंपरी-चिंचवड शहराचा विकास केला. या मंदिराचे प्रत्येक काम तसेच मदत राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून देण्यास आम्ही कटीबध आहोत. असे भव्य आणि सुंदर मंदिर बांधल्याबद्दल उत्तर भारतीय समाजाचे त्यांनी कौतुक केले. या चतुर्थ वर्धापनदिनानिमित्त महाप्रसादांचे भव्य आयोजन करण्यात आले होते. यावेळी जवळपास अडीच हजार भाविक भक्तांनी दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला.

धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंदिरांचे ट्रस्टी इंद्रमन सिंह (अध्यक्ष), चंद्रप्रकाश दूबे (संस्थापक), राजेश सिंह (उपाअध्यक्ष), ठाकुर उपेंन्द्र सिंह (सचिव), बाबूलाल सिंह (कार्याध्यक्ष), सच्चिदानंद द्रिवेदी (कोषाध्यक्ष), नविन सिंह (उपसचिव), राजेश प्रजापति, मनोज त्रिपाटी, रमेश विश्वकर्मा इत्यादींनी परिश्रम घेतले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button