breaking-newsराष्ट्रिय

उत्तर प्रदेशात गंगा नदीवर 6 पदरी पूल बांधायला मंजुरी

नवी दिल्ली – केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अर्थ विषयक केंद्रीय समितीने, राष्ट्रीय महामार्ग-96 वर उत्तरप्रदेशातील फाफमाऊ , अलाहाबाद येथे गंगा नदीवर 9.9 किमी लांब 6 पदरी नवीन पूल बांधायला मंजुरी दिली आहे. यासाठी 1948.25 कोटी रुपये खर्च येईल.

हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी तीन वर्षांचा कालावधी लागेल आणि डिसेंबर 2021 पर्यंत तो पूर्ण होण्याची शक्‍यता आहे. नवीन पुलामुळे अलाहाबादमध्ये एनएच-96 वर सध्या होणारी वाहतूक कोंडीची समस्या दूर व्हायला मदत होईल. नवीन पुलामुळे कुंभ, अर्ध कुंभ, प्रयाग इथे होणाऱ्या वार्षिक स्नानादरम्यान अधिकाधिक लोकांना अलाहाबादला पोहचणे सोपे होईल. यामुळे तीर्थस्थळ पर्यटन आणि प्रयाग शहराच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.

तसेच या सहा पदरी पुलामुळे लखनौ – फ़ैझाबाद या मार्गावर राष्ट्रीय महामार्ग 27 आणि 76 द्वारे नैनी पुलावरून येणाऱ्या प्रवाशांना आणि दळणवळणाला फायदा होणार आहे.

आजच्या बैठकीत नदी जोड प्रकल्पासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष समितीच्या सद्यस्थिती आणि प्रगतीचा आढावा घेण्यात आला. या समितीने आपला अहवाल आज मंत्रिमंडळाला सादर केला. सर्वोच्च न्यायालयाने नदी जोड प्रकल्पाच्या अध्ययनासाठी समिती नियुक्त करण्याचे निर्देश केंद्र सरकारला दिले होते, त्यानुसार ही समिती तयार करण्यात आली आहे. या समितीने नदी जोड प्रकल्पाबाबत दिलेल्या अहवालात, केन-बेटवा जोड, दमणगंगा-पिंजाळ जोड, पारा-तापी-नर्मदा जोड आणि इतर हिमालयन आणि बारमाही नद्यांच्या जोडणीविषयीच्या अध्ययनाचा सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button