breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘ई-लर्निंग’ निविदेस आक्षेप म्हणजे स्टंटबाजी, ॲड. सचिन भोसलेंचा राहूल कलाटे यांच्यावर आरोप

पिंपरी, (महाईन्यूज) – स्मार्ट सिटी अंतर्गत पिंपरी चिंचवड महापालिकेतील 123 शाळेतील विद्यार्थ्यांना ‘ई-लर्निंग’ स्कूल प्रकल्पांतर्गत देण्यात येणारी सुविधा आवश्यक आहे. या प्रकल्पातून विद्यार्थ्यांच्या कौशल्य व गुणवत्तेत वाढ होईल. मात्र बुधवारी (12 जून) झालेल्या स्थायी समिती बैठकीत शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांनी या प्रकल्पाच्या निविदेस आक्षेप घेतला. कलाटे यांनी घेतलेला आक्षेप म्हणजे ‘स्टंटबाजी’ आहे, असा आरोप शिवसेना नगरसेवक भोसले यांनी केला आहे.

स्मार्ट सिटी हे एसपीव्ही अंतर्गत स्वतंत्र नोंदणी झालेली कंपनी आहे. स्मार्ट सिटीला निधी खर्च करण्याबाबत व विकास प्रकल्प राबविण्याबाबत स्वतंत्र अधिकार आहेत. या कंपनीच्या संचालक मंडळावर राहुल कलाटे यांची नियुक्ती झाली नाही. याचा राग मनात ठेवून आकस बुद्धीने कलाटे हे या निविदा प्रक्रियेला विरोध करीत आहेत. असे पत्रक नगरसेवक भोसले यांनी प्रसिद्धीस दिले आहे.

स्मार्ट सिटी कंपनीला विविध विकास प्रकल्प राबविण्यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार व महापालिका निधी देत असते. निविदा मंजूर करण्याचे सर्व अधिकार एसपीव्ही-स्मार्ट सिटी संचालक मंडळास आहेत. स्मार्ट सिटी कंपनीने मागील वर्षी महापालिकेच्या 13 शाळांमध्ये ‘पायलट प्रोजेक्ट’ म्हणून ‘ई-लर्निंग’ स्कूल प्रकल्प राबविला. त्यावेळी मात्र कलाटे यांनी विरोध दर्शविला नाही. मात्र, या वर्षी स्मार्ट सिटी कंपनीने शहरातील सर्व विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढावी या उद्देशाने ‘ई-लर्निंग’ प्रकल्प 123 शाळांतून राबविण्यासाठी निविदा मंजूर केली. या प्रकल्पास शिवसेनेचा पूर्ण पाठींबा आहे. शिवसेना नेहमी विद्यार्थ्यांचे हित, नागकिरांना आवश्यक असणारे प्रकल्प आणि जनहिताच्या प्रकल्पांचे समर्थन करीत आली आहे. मात्र, कलाटे यांनी स्थायी समितीत सभेत ‘ई-लर्निंग’ निविदा प्रक्रियेला विरोध केला आहे. या निविदा प्रक्रियेला विरोध करण्याचे कारण नाही, असे भोसले यांनी प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button