breaking-newsमनोरंजन

ईशाच्या लग्नात अमिताभ, आमीर वाढपी

भारतातील उद्योगपती मुकेश आणि नीता अंबानी यांच्या आपल्या एकुलत्या एक मुलीचा लग्नसोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. या शाही सोहळ्याला ग्रॅण्ड, भव्य..दिव्य हे शब्दही अक्षरश: फिके पडले. उद्योग, राजकारण, बॉलिवूड जगतापासून सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी या लग्नाला हजेरी लावली होती. परंतु या सोहळ्यातील आणखी एका दृश्‍याने सगळ्यांचे लक्ष वेधून गेले.

लग्नात रात्री पाहुणे मंडळी जेवायला बसली तेव्हा त्यांना जेवण वाढायला दुसरे-तिसरे कुणी नाही तर चक्क महानायक अमिताभ बच्चन होते. हे कमी की काय म्हणून मिस्टर परफेक्‍शनिस्ट आमीर खानही वऱ्हाडी मंडळींना जेवण वाढताना दिसला. वाढप्याच्या भूमिकेत असलेल्या अमिताभ बच्चन आणि आमीर खान यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. याशिवाय ऐश्‍वर्या राय-बच्चन, आराध्या बच्चन, अभिषेक बच्चन आणि शाहरूख खान पाहुण्यांना जेवण देत असल्याचे फोटोही व्हायरल झाले आहेत.

देशातले इतके मोठे कलाकार जर जेवण वाढत असतील तर पाहुण्यांना नक्कीच दोन घास जास्त गेले असतील. मुलीकडचे बनून अमिताभ आणि आमीर यांनी लग्नाच्या प्रत्येक विधीमध्ये सक्रिय सहभाग घेतला होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button