breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

‘ईव्हिएम’वर संशय असल्याने काँग्रेसच्या माजी आमदाराचा निवडणूक न लढण्याचा निर्णय

बुलडाणा : बुलडाण्याच्या खामगाव विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी ईव्हीएमवर संशय व्यक्त करीत निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना दोन महिन्यांपूर्वीच कल्पना दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव विधानसभा मतदारसंघाचे तीन वेळा आमदार राहिलेले माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी विधानसभा निवडणुकीतून अधिकृतरित्या माघार घेतली आहे. काँग्रेसच्या पहिल्या यादीतच त्यांच्या नावाची घोषणा होणार होती. मात्र त्यांनी पक्षश्रेष्ठींना भेटून ईव्हीएमवर शंका असल्यामुळे मी निवडणूक लढणार नसल्याचे पक्षाला कळवलं आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणासह खामगाव विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांमध्ये एकच खळबळ उडालेली आहे. सानंदांनी खामगाव मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी अ.भा. काँग्रेसचे सरचिटणीस मुकुल वासनिक, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात या दोन्ही ज्येष्ठ नेत्यांचा आग्रह होता. मात्र, दोन महिन्यांपूर्वीच प्रदेशाध्यक्षांना प्रत्यक्ष भेटून निवडणूक लढविणार नसल्याचा निर्णय घेतला असल्याचे मी सांगितले होते, असा दावा त्यांनी केला.

ज्येष्ठ नेत्यांच्या आदेशामुळे पहिल्या यादीतच माझ्या नावाचा समावेश होण्याची शक्यता होती. मात्र 28 सप्टेंबरला दुपारी मुकुल वासनिक आणि बाळासाहेब थोरात यांना मी निर्णयावर ठाम असल्याचे लेखी पत्र देऊन दूरध्वनीवरुन कळविले होते, असंही सानंदा म्हणाले. विशेष म्हणजे याबाबत त्यांनी रात्री उशिरा प्रसिद्धी पत्रकही काढले असून त्यामध्ये निवडणूक न लढविण्याबाबतची कारणे नमूद केली आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button