breaking-newsआंतरराष्टीय

इराणच्या अण्विक कृत्यांविषयी इस्त्रायलच्या पंतप्रधानांची मोदींशी चर्चा

जेरूसलेम – इराणने आपला वादग्रस्त अण्विक कार्यक्रम सुरूच ठेवल्याने त्याच्या विषयी जागतिक जनमत संघटीत करण्यासाठी इस्त्रायलचे पंतप्रधान बेझांमीन नेतानयाहू हे जगभरातील विविध नेत्यांशी चर्चा करीत आहेत. याच संबंधात त्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन करून इराणच्या कृत्यांबद्दल माहिती दिली. या आधी त्यांनी ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटनच्या पंतप्रधानांशीही चर्चा केली आहे असे नेतानयाहू यांच्या माध्यम सल्लागाराने सांगितले.

या प्रदेशातील घडामोडींबरोबरच पंतप्रधान नेतानयाहू हे जागतिक नेत्यांना इराणच्या अण्विक कार्यक्रमाचीही माहिती देत आहेत असे इस्त्रायलने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे. इराण गुप्तपणे अणूबॉंब तयार करीत असून त्या विषयीचे खात्रीशीर पुरावे मोसाद या इस्त्रायली गुप्तचर संघटनेने मिळवले आहेत. सुमारे एक लाख पानांचे हे पुरावे आम्ही जागतिक पातळीवर मांडत आहोत असे नेतानयाहु यांनी पत्रकारांना सांगितले आहे.

आम्ही नेमके काय पुरावे गोळा केले आहेत ते पहाण्यात ब्रिटन, जर्मनी आणि फ्रांस या देशांनी स्वारस्य दाखवले आहे अशी माहितीही त्यांनी दिली. या पुराव्यांची शहानिशा करण्यासाठी आपण चीन आणि रशियाच्या राष्ट्रप्रमुखांनाही इस्त्रायला येण्याचे निमंत्रण दिले आहे अशी माहितीही त्यांनी दिली. इराणच्या छुप्या युद्ध तयारीच्या संबंधात मोसाद या गुप्तहेर संघटनांनी थेट इराण मध्ये घुसखोरी करून खात्रीशीर माहिती मिळवली असून ती जगापुढे मांडणे हे आमचे कर्तव्य आहे. त्यातून इराणपासून असलेल्या धोक्‍याची जाणिव जगाला करून देणे आवश्‍यक आहे असेही नेतानयाहू यांनी म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button