breaking-newsआंतरराष्टीय

इराकी न्यायालयाने दहशतवाद्यांशी विवाह केलेल्या 40 महिलांना सुनावली फाशी

बगदाद (इराक) – इराकमधील एका न्यायालयाने 40 महिलांना फाशीची शिक्षा ठोठावली आहे. या सर्व महिलांचे पती इसिसचे दहशतवादी आहेत. यांना शिक्षा सुनावण्यासाठी न्यायालयाने फक्त 10 मिनिटे घेतली. आपल्या दहशतवादी पतींना दहशतवादी कारवायांमध्ये साथ दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. यापैकी अनेक महिलांना आपला पती इसिस दहशतावादी असल्याचे अगोदरपासून माहीत होते, तरीही त्या त्यांच्याशी विवाहबद्ध होऊन इराक आणि सीरियामध्ये आल्या होत्या. मात्र केवळ दबावामुळे दहशतवाद्यांशी विवाह केलेल्या काही महिलांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

इसिसच्या दहशतवाद्यांना साथ देण्याच्या आरोपावरून सध्या सुमारे 1,000 महिला इराकच्या तुरुंगांमध्ये कैदेत आहेत. यापैकीच 40 जणींना फाशी सुनावण्यात आली आहे. शिक्षा भोगत असलेल्या महिलांपैकी बहुतेक विधवा असून त्याच आपल्या मुलांचे पालनपोषण करतात. शिक्षा सुनावण्याच्या वेळी यापैकी अनेकजणी आपल्या मुलांसह न्यायालयात हजर होत्या.

विवाहापूर्वी आपल्या पतीबद्दल आपल्याला काहीच माहिती नव्हती असे बहुतेक जणींचे म्हणणे आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button