पुणे

इमारतीवर अनधिकृतपणे उभारलेल्या ‘टॉवर’वर कारवाई करा; शिवसेनेची मागणी

पिंपरी – चिंचवडमध्ये राहत्या इमारतीवर बेकायदेशीरपणे उभारण्यात आलेल्या मोबाईल नेटवर्किंग टॉवरमुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. या टॉवरवर तातडीने कारवाई करा, अशी मागणी शिवेसनेच्या नगरसेविका मीनल यादव यांनी केली आहे.

याबाबत नागरिकांच्या शिष्टमंडळासोबत नगरसेविका यादव यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांची भेट घेऊन त्यांना मागणीचे निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, प्रभाग क्रमांक 14 मोहननगर परिसरातील तीन मजली असलेल्या एका इमारतीवर अनधिकृतपणे नेटवर्किंगचे लोखंडी टॉवर उभारण्यात आले आहे. हे टॉवर अतिशय धोकादायकरित्या उभारण्यात आले आहे. मोबाईल टॉवरच्या ध्वनी लहरीच्या प्रदूषणाचा नागरिकांना मोठा त्रास होत आहे.

त्याच्या नेटवर्क रेडिएशनमुळे आसपासच्या दाटवस्तीच्या रहिवाशांना शारिरीक अपाय होण्याची संभावना आहे. त्यामुळे हे टॉवर हटविण्याची स्थानिक रहिवाशांची मागणी आहे. नागरिकांना काही त्रास होण्याच्या अगोदरच ‘टॉवर’ काढण्यात यावीत, अशी मागणी नगरसेविका यादव यांनी निवेदनातून केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button