breaking-newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

इतिहासात प्रथम नागरिकाला अपमानास्पद वागणूक

सत्ताधा-यांचा भोंगळ कारभार

उद्घाटन कार्यक्रमात महापाैरांना डावलले

पिंपरी : पिंपळे सौदागर, रहाटणी येथील दोन भुयारी मार्गांच्या कामांच्या भुमिपूजन कार्यक्रमांच्या नियोजनावरून महापालिकेच्या राजकारणात कलगीतुरा रंगला आहे. अचानक ठरलेल्या या कार्यक्रमांपासून महापौर, आयुक्त यांना डावलले आहे. विशेष म्हणजे शहराचे प्रथम नागरिक व महापालिकेचे आयुक्त् हे कार्यक्रमाबाबत अनभिज्ञ होते. त्यामूळे भाजप पदाधिकारी, नगरसेवक खासगीत नाराजी व्यक्त करत असून राष्ट्रवादीने ‘महापौरांना तरी बोलवा’, अशी मागणी आयुक्तांकडे केली आहे.

नाशिकफाटा ते वाकड बीआरटीएस रस्त्यावर गोंविद गार्डन चौक व रहाटणी ड प्रभागाजवळील पार्क स्ट्रिटसमोरील सब-वेच्या कामाचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते गुरुवारी (दि.५) भूमिपूजन झाले. यावेळी स्थायी समिती अध्यक्षा ममता गायकवाड, नगरसेवक नाना काटे, शत्रुध्न काटे, शितल काटे, निर्मला कुटे, आरती चौंधे, क्षेत्रीय अधिकारी स्मिता झगडे, माजी नगरसदस्य विनायक गायकवाड आदी उपस्थित होते.
दरम्यान, या भूमिपूजन कार्यक्रमांचे नियोजन स्थापत्य विभागातील अधिका-यांनी गुरुवारी अचानकपणे केली. त्याबाबत महापौर नितीन काळजे, आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व अधिका-यांनाही माहिती नव्हती. त्यावरून पालिकेत राजकीय कलगीतुरा रंगल्याचे पाहायला मिळाले. महापौर काळजे उपस्थित नव्हते. मात्र, पक्षाची बाजू सावरण्यासाठी त्यांनी आपण उशिरा पोहोचल्याचे कारण दिले. पक्षनेते एकनाथ पवार यांनीही तशीच वेळ मारून नेली. भाजपच्या काही नगरसेवकांनी नियोजन न करता कार्यक्रम घेतल्याचे खासगीत सांगितले.
त्याचा आधार घेत राष्ट्रवादीचे नगरसेवक नाना काटे, माजी नगरसेवक प्रशांत शितोळे यांनी आयुक्तांना गाठून जाब विचारला. त्यावेळी आयुक्तांनाच माहिती नसल्याचे समोर आले. त्यामुळे राष्ट्रवादीने बाकी कोणाला नाही, परंतु महापौरांना तरी नियोजनात सहभागी करून घ्या, अशी उपरोधिक मागणी आयुक्तांकडे केली. प्रोटोकॉलनुसार महापौरांना नियोजन माहिती असणे आवश्यक आहे. परंतु, पालिका प्रशासनाने परस्पर नियोजन केल्याने भाजपमध्ये कलगीतुरा रंगला आहे. त्यामुळे विरोधकांनाही आयते कोलित मिळाले आहे. दरम्यान, विरोधकांच्या आरोपांनुसार आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी हा प्रकार गांभीर्याने घेतला. त्यांना विचारले असता “दोन सब-वेची भुमिपूजन झालेली आहेत. या कार्यक्रमांच्या नियोजनाबाबत संबधितांकडून माहिती घेतली जाणार आहे, असे पत्रकारांशी बोलतांना सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button