breaking-newsराष्ट्रिय

इंधन दरवाढीचे सत्र कायम, पेट्रोल 9 पैसे तर डिझेल 16 पैशांनी महागले

  • इतर प्रमुख शहरातील इंधनाचे दर

मुंबई : पेट्रोल (90.84), डिझेल (79.40)

पुणे : पेट्रोल (90.67), डिझेल (78.01)

चेन्नई : पेट्रोल (86.80), डिझेल (79.08)

कोलकत्ता : पेट्रोल (85.30), डिझेल (76.64)

दिल्ली  : पेट्रोल (83.49), डिझेल (74.79)

नवी दिल्ली – राजधानी दिल्लीसह इतर राज्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये रविवारी पुन्हा एकदा वाढ झाली असून इंधनदरवाढीचा भडका कायम अाहे. आज दिल्लीमध्ये पेट्रोलच्या दरामध्ये लीटरमागे 9 पैसे आणि डिझेलच्या दरामध्ये लीटरमागे 16 पैशांनी वाढ झाली आहे.

या दरवाढीमुळे दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर 83.49 रुपये तर डिझेलचे दर प्रतिलीटर 74.79 रुपये इतक्‍या उच्चांकी पातळीवर पोहोचले आहेत.तर देशाची अार्थिक राजधानी मुंबईमध्ये प्रति लीटर पेट्रोलसाठी 90.84 रूपये तर प्रति लीटर डिझेलसाठी 79.40 रूपये मोजावे लागत आहे. तर पुणे शहरात आज प्रति लीटर पेट्रोलचा 90.67 रूपये  तर डिझेलचा प्रति लीटर 78.01 रूपये असा दर आहे.

दिल्लीमध्ये जानेवारी 2018 रोजी पेट्रोलचा दर 69.97 रुपये प्रति लिटर, तर डिझेलचा दर 59.70 रुपये प्रति लिटर असा होता. जानेवारी 2018 महिन्याच्या पहिल्या दिवसापासून ते आजच्या तारखेपर्यंत पेट्रोलचे दर 13.52 रूपयांनी तर डिझेलचे दर 15.09 रूपयांनी महागले आहे.

पेट्रोल आणि डिझेलचे दरात गेल्या काही दिवसापासून सातत्याने वाढ होत असून सामान्य नागरिकांच्या खिशाला झळ बसत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड आॅईलच्या किंमतीतील चढउतार आणि डाॅलरच्या तुलनेत रूपयांच अवमूल्यन होत असल्याने इंधनदरवाढ होत असल्याचे सांगण्यात येत आहे.

या इंधनदरवाढीमुळे इतर जीवानश्यक वस्तूंचे दरसुध्दा वाढत असून सामान्य नागरिकांचे महागाईने कंबरडे मोडले आहे. महागाईमुळे जनता अक्षरशः मेटाकुटीला आली आहे. इंधन दरवाढीमुळे नागरिकांच्या संतापाचा भडका उडत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button