Uncategorized

इंग्लंडमध्ये पुन्हा कडक लॉकडाऊन

लंडन – इंग्लंडमध्ये कोरोनाच्या नव्या प्रकाराने थैमान घातले आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी इंग्लंडमध्ये पुन्हा एकदा कडक लॉकडाऊनची घोषणा केली आहे. जॉन्सन यांनी सोमवारी देशवासियांना संबोधित करताना हा लॉकडाऊन बुधवारपासून लागू होईल अशी घोषणा केली. तसेच लॉकडाऊनच्या काळात जवळपास 56 मिलियन लोक इंग्लंडमध्ये परततील असेही त्यांनी सांगितले.

स्कॉटलंडने लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर जॉन्सन यांनी संपूर्ण इंग्लंडमध्ये लॉकडाऊनची घोषणा केली. बुधवारपासून हा लॉकडाऊन लागू होणार आहे. त्यामुळे बुधवारपासून इंग्लंडमधील सर्व शाळा बंद ठेवण्यात येतील. तसेच हा लॉकडाऊन गेल्यावर्षी मार्च ते जून दरम्यान लावण्यात आलेल्या लॉकडाऊनप्रमाणेच असेल, असेही जॉन्सन यांनी स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर कोरोनाच्या नव्या प्रकाराचा सामना करण्यासाठी आपल्याला अधिक मेहनत घ्यावी लागणार हे स्पष्ट असल्याचेही जॉन्सन म्हणाले.

तसेच लॉकडाऊन काळात अतंत्य गरजेच्या कामासाठी नागरिकांना घराबाहेर पडण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यात गरजेचे काम, कार्यालयात जाण्यासाठी, वर्क फ्रॉम होम करु शकत नसाल तर, व्यायाम, मेडिकल आणि कौटुंबिक हिंसेपासून वाचण्यासाठी तुम्ही घराबाहेर पडू शकता, असे जॉन्सन यांनी सांगितले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button