breaking-newsमहाराष्ट्र

आसाराम बापूच्या आश्रमाचे अतिक्रमण जमीनदोस्त

नाशिक : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नाशिकमध्ये अतिक्रमण हटाव मोहिम सुरु केली आहे. गोदावरी काठावर असणाऱ्या आसाराम बापूच्या आश्रमाचे अनधिकृत बांधकाम महापालिका अतिक्रमण विरोधी पथकाकडून जमीनदोस्त करण्यात आले.

शहरात सर्वत्र अतिक्रमण विरोधी मोहिम राबवली जाणार आहे. आसाराम बापूच्या आश्रमावर अतिक्रमण हटवण्याची कारवाई सुरु आहे. मात्र कोर्टाने यावर स्थगिती आणली आहे. यावर 28 मे रोजी निर्णय होईल आणि त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येईल. नाशिकच्या सिडको भागातील घरांवर बुलडोझर चालवण्याचा इशारा तुकाराम मुंढे यांनी दिला आहे. सिडकोतील अतिक्रमण विरोधी मोहिमेवरून वाद होण्याची शक्यता आहे.

गोदावरीच्या पूररेषेतील अनधिकृत बांधकामे हटवण्याच्या सूचना मनपाने या आधीच दिल्या होत्या. त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आसाराम बापू आश्रमापासून पूररेषेतील अतिक्रमण हटवण्यास सुरवात झाली आहे. दरम्यान, या आधीही आसाराम बापू आश्रमाचं अतिक्रमण काढण्यात आले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button