breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

आव्हाने कितीही मोठी असली तरी भारत थांबणार नाही – राष्ट्रपती

नवी दिल्ली – आज संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने सुरुवात झाली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सरकारने मागील वर्षभरात केलेल्या कामांचा उल्लेख करतानाच आगामी काळात केल्या जाणाऱ्या योजनांवर यावेळी प्रकाश टाकला. तसेच केंद्र सरकारच्या कामाचे कौतुक करताना राष्ट्रपतींनी आत्मनिर्भरतेचा पुनरुच्चार केला. कोरोना काळात होत असलेले हे अधिवेशन महत्त्वाचे असल्याचे त्यांनी म्हटले.

राष्ट्रपती म्हणाले, ‘आव्हाने कितीही मोठी असली तरी भारत थांबणार नाही, गेल्या वर्षात भारताने अनेक संकटांना तोंड दिले. केंद्र सरकारच्या निर्णयामुळे भारतातील लोकशाही मजबूत झाली. केंद्र सरकारच्या निर्णयाचा फायदा देशातील जनतेला झाला. कोरोनाने आत्मनिर्भर भारताचे महत्त्व पटवून दिले. कमी कालावधीत 200 प्रयोगशाळा निर्माण केल्या. भारत सर्वात मोठे लसीकरण अभियान चालवतोय, याचा अभिमान आहे’, असे राष्ट्रपतींनी सांगितले.

वाचा :-… तर मी आत्महत्या करेन, शेतकरी नेत्याचा सरकारला इशारा

त्याचबरोबर ‘सहा राज्यात गरिब कल्याण योजना सरकारने राबवली. सरकारच्या प्रयत्नांमुळे गरिबांची मदत झाली आहे, त्यांना सुविधा मिळाली आहे. ओरोग्याबाबत गरिब जनतेचा खर्चही वाचला आहे. तसेच केंद्र सरकारने वैद्यकीय महाविद्यालये वाढवली, आज देशात ५६२ वैद्यकीय महाविद्यालये आहेत’, अशी माहिती राष्ट्रपतींनी दिली. तर सरकारने कृषीमालांना दीडपट हमी भाव दिला, सरकारी खरेदी केंद्रही वाढवली. संसदेने कृषी विधेयके मंजूर केली. केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांचा 10 कोटी छोट्या शेतकऱ्यांना लाभ झाल्याचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी यावेळी म्हटले.

तसेच ‘केंद्र सरकार सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे पालन करेल. पूर्वीच्या कायद्यातील सुविधा रद्द करण्यात आलेल्या नाहीत. कृषी कायद्यांविषयी गैरसमज पसरवण्यात आले असून ते दूर करण्यासाठी प्रयत्न केले जातील’, असे राष्ट्रपती म्हणाले. त्याचबरोबर ‘100 किसान रेल्वे सुरु केल्या गेल्या. सरकारने शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी प्रयत्न केले, पंतप्रधान किसान योजनेचा देशातील लहान शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा झाला आहे’, अशी माहिती राष्ट्रपतींनी दिली. तसेच १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला तिरंग्याचा झालेला अपमान ही दुर्दैवी घटना असल्याचे राष्ट्रपतींनी यावेळी नमूद केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button