breaking-newsमनोरंजन

आर्चीला जायचं बॉलिवूडमधल्या ‘या’ अभिनेत्यासोबत डेटवर

‘मराठीत सांगितलेलं कळत न्हाय..इंग्रजीत सांगू’ असे म्हणत अनेकांच्या मनावर राज्य करणारी ‘सैराट’ चित्रपटातील अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगूरु. रिंकूच्या लव्ह लाईफबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते फार उत्सुक असतात. रिंकू कोणाला डेट करते? रिंकू सिंगल आहे की रिलेशनशीपमध्ये आहे अशा अनेक चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगल्या आहेत. मात्र एरवी याबद्दल बोलणे टाळणाऱ्या रिंकूने तिला कोणत्या अभिनेत्याला डेट करायला आवडेल याचा खुलासा केला आहे.

काही दिवसांपूर्वी रिंकूने कलर्स टीव्हीवरील ‘एकदम कडक’ या शोमध्ये हजेरी लावली होती. दरम्यान तिला अनेक प्रश्न विचारण्यात आले होते. त्यामधील ‘तुला कोणासोबत डेटवर जायला आवडेल?’ या प्रश्नाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यावर आर्चीने एक दिवस तिला अभिनेता विकी कौशलसोबत डेटवर जायला आवडेल असे उत्तर दिले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button