breaking-newsराष्ट्रिय

आरोग्य सुविधांमध्ये भारत ‘या’ क्रमांकावर…

नवी दिल्ली : देशातील आरोग्य सुविधा अजुनही ‘व्हेंटिलेटर’वर असल्याचे पुन्हा एकदा जगासमोर आले आहे. या संदर्भात लॅन्सेट या संस्थेने केलेल्या १९५ देशांच्या यादीत भारताचा क्रमांक तब्बल १४५वा आहे. या यादीत बांगलादेश, श्रीलंका, भूतान या छोट्या शेजाऱ्यांनीही भारताला मागे टाकले आहे.

आरोग्यसेवांची उपलब्धता आणि त्यांची गुणवत्ता याबाबतीत भारताला ४१.२ गुण देण्यात आले आहेत. १९९० मध्ये ते २४.७ इतकेच होते. जरी भारताच्या हेल्थकेअर अ‍ॅक्सेस अँड क्वालिटी निर्देशांकाने २००० ते २०१६ या काळात वेगाने झेप घेतली असली तरी सर्वांत चांगल्या आणि सर्वांत कमी गुणांमधील दरीही रूंदावल्याचे दिसून येते. सर्वात चांगल्या आणि सर्वात वाईट गुणांमध्ये १९९० साली २३.४ गुणांचा फरक होता तो २०१६ मध्ये ३०.८ इतका झाला आहे.

भारतापेक्षा चीन (४८ गुण), श्रीलंका (७१), बांगलादेश (१३३), भूतान (१३४) यांची स्थिती चांगली आहे तर नेपाळ (१४९), पाकिस्तान (१५४), अफगाणिस्तान (१९१) यांच्यापेक्षा भारताची स्थिती चांगली असल्याचे या आकडेवारीतून दिसून येते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button