breaking-newsआरोग्यताज्या घडामोडीपुणे

आयुक्तांनी भाजी खरेदीला सांगवीत यावे – प्रशांत शितोळे

पिंपरी- मुळा व पवना नदीतील जलपर्णीमुळे सांगवी परिसरात डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणावर झाली आहे. गेल्या दोन महिन्यांपासुन जलपर्णीकडे आरोग्य विभागाने दुर्लक्ष केले आहे.

जुनी सांगवीकरांना संध्याकाळी घराबाहेर पडणे मुश्किल झाले आहे. सार्वजनिक ठिकाणी डासांचा उपद्रव वाढला आहे. तक्रारी निवेदने देऊनही पालिका प्रशासनाकडून या गोष्टीकडे दुर्लक्ष केले आहे. याबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पिंपरी चिंचवड कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे यांनी पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तांनी जुनी सांगवीत सहपरिवार सायंकाळी भाजी खरेदीला यावे या आशयाचे निवेदनातुन निमंत्रण दिले आहे.

दरम्यान, नागरीकांना डासामुळे घराबाहेर पडणे मुश्कील झाले आहे.मागील आठवड्यात जलपर्णी काढण्याची मागणी करूनही ती पूर्ण होताना दिसत नाही.तर डासांपासुन नागरीकांच्या बचावासाठी धुरीकरण व औषध फवारणी नियमित होत नाही.आपण नागरीकांना किती त्रास होतो हे पाहण्यासाठी आरोग्य अधिकाऱ्यासह जुनी सांगवीत भेट द्यावी. हे आग्रहाचे निमंत्रण आहे. असे निवेदनात म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button