breaking-newsआरोग्यताज्या घडामोडीपुणे

आयुक्तांनी दीड तास घेतली, वायसीएम रुग्णालयाची झाडाझडती

वैद्यकीय महाविद्यालयांचा आढावा ः आरोग्य वैद्यकीय अधिका-यांची अनुउपस्थिती

पिंपरी – महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता अचानक यशंवतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात भेट दिली. त्यांनी वायसीएम रुग्णालयात प्रवेश करताच केसपेपर विभागाकडे धाव घेतली. तेथील उपस्थितीत रुग्णाकडून अडीअडचणी जाणून घेतल्या. तसेच रुग्णालयातील अन्य विभागांची समस्यांची विचारपुस करुन चाणक्य हॅालमध्ये रुग्णालयासह वैद्यकीय महाविद्यालयांचा सध्यस्थितीचा आढावा घेतला. यावेळी पुर्वीप्रमाणे त्या-त्या मागण्यांचे गा-हाणे आयुक्तांसमोर वैद्यकीय अधिक्षकांनी मांडले. परंतू उपलब्ध परस्थितीत रुग्णांना चांगली सेवा देवून कामकाज करण्याचा सल्ला आयुक्तांनी वैद्यकीय अधिक्षकांना दिला.
याप्रसंगी महापालिका सभागृहनेता एकनाथ पवार, नगरसेविका सुजाता पालांडे, अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी डॅा पवन साळवे, वैद्यकीय अधिक्षक मनोज देशमुख, उपवैद्यकीय अधिक्षक डॅा शंकर  जाधव, डॅा पद्याकर पंडीत उपस्थित होते.
संत तुकारामनगर येथील महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएम) डॅाक्टरांसह चतुर्थ कर्मचा-यांची अपुरी संख्या, देखभाल दुरुस्ती अभावी बंद अवस्थेत असणा-या यांत्रिक सामुग्री, रुग्णांच्या वॅार्डातील अस्वच्छता, डॅाक्टरांना सुरक्षेअभावी रुग्णांच्या नातेवाईकांकडून होणारी मारहाण, वैद्यकीय अधिक्षकांचे रुग्णालयावर नसलेले नियंत्रण, डॅाक्टर, परिचारिकांचे कामकाजाकडे दुर्लक्ष, स्वच्छतागृहाची दुर्गंधी, रुग्णांच्या वॅार्डातील डेखूनांचे वाढलेला प्रादुभार्व आदींसह समस्येची माहिती जाणून घेतली.
महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनुसार मानधनावरील कर्मचाऱ्यांना सोयी-सुविधा दिल्या जात नाहीत. मानधनावरील कर्मचाऱ्यांना मेडीकल व पगारी रजा मिळत नाही. तरीही त्याच कर्मचाऱ्यांच्या भरवशावर वायसीएम रुग्णालयाचा डोलारा तग धरुन राहिला आहे. तसेच, मानधनावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना भविष्य निवार्ह निधी, कर्मचारी राज्य विमा मिळत नाही. याबाबत कित्येक वर्षांपासून महापालिकेकडे “पीएफ’ व “ईएसआय’ची मागणी या कर्मचाऱ्यांनी लावून धरलेली आहे. परंतु, तत्कालीन व विद्यमान सत्ताधारी कर्मचाऱ्यांच्या मागणीकडे सोयीस्करपणे डोळेझाक करु लागले आहेत.
दरम्यान, वायसीएम रुग्णालयाचे प्रस्ताविस्त महाविद्यालय सध्यस्थितीचा आढावा त्यांनी घेतला. त्यावेळी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक आणि सहाय्यक असिस्टंट प्राध्यापक पदावरील डॅाक्टारांची संख्याही अपुरी आहे त्या जागा तातडीने भरुन घेण्याच्या सुचना आयुक्तांनी दिल्या. तसेच इंडियन मेडीकल कैान्सीलचे पथक तपासणी करण्यासाठी येणार आहे. त्यांचे योग्य नियोजन करण्याच्या सुचनाही उपस्थित डॅाक्टारांना यावेळी आयुक्त हर्डीकर यांनी दिल्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button