breaking-newsताज्या घडामोडीपुणे

आयुक्तांनी जलपर्णी हटविण्याचा मुहूर्त शोधावा; काँग्रेसकडून ‘पंचांग’ भेट

  • पवना, मुळा नदीपात्रातील जलपर्णीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात
  • काँग्रेसतर्फे आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन

पिंपरी- पवना आणि मुळा नदींच्या पात्रात वाढलेल्या जलपर्णीमुळे नागरिक त्रस्त असताना प्रशासन त्याची दखल घेत नाही. त्यामुळे जलपर्णी काढण्याचा मुहूर्त बघण्यासाठी युवक काँग्रेसने महापालिका आयुक्तांना ‘पंचांग’ भेट दिले आहे. प्रशासनाने ‘पंचांग’ पाहून जलपर्णी काढण्यासाठी चांगला शुभमुहूर्त काढवा, अशी उपरोधिक मागणी काँग्रेसने केली आहे.

मावळ लोकसभा मतदार संघाचे युवक अध्यक्ष नरेंद्र बनसोडे, सरचिटणीस कुंदन कसबे, चिंचवड विधानसभा युवक काँग्रेच कमिटीचे अध्यक्ष मयूर जयस्वाल, पिंपरी मतदार सघांचे युवकचे सरचिटणीस हिरा जाधव यांच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना हे ‘पंचांग’ भेट दिले. त्यासोबत आयुक्तांना युवक काँग्रेसने निवेदन दिले. त्यात म्हटले आहे की, मुळा आणि पवना नदीतील जलपर्णी काढण्याची मागणी सातत्याने करण्यात येत आहे. तरीही, पालिका प्रशासन त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. जलपर्णी वेळेवर न काढल्याने सांगवीत डासांचे साम्राज्य वाढले आहे. डासांमुळे सांगवीकर हैराण झाले आहेत. लहान मुले, नागरिक आजारी पडत आहेत. डासांमुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा निषेध करत जलपर्णी काढण्याचा मुहूर्त बघण्यासाठी आयुक्तांना पंचांग भेट देण्यात आले. प्रशासनाने ‘पंचांग’ पाहून जलपर्णी काढण्यासाठी चांगला शूभ मुहूर्त काढवा, अशी मागणी निवेदनाव्दारे युवक काँग्रेसने केली आहे

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button