breaking-newsराष्ट्रिय

‘आयसीयू’मध्ये महिला रुग्णावर सामूहिक बलात्कार

मेरठ (उत्तर प्रदेश): एका खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात (आयसीयू) उपचार घेत असलेल्या 30 वर्षांच्या महिलेवर तिघांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना रविवारी (ता. 24) घडली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

श्वसनाचा त्रास होत असल्यामुळे महिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाली होती. डॉक्टरांनी उपचारासाठी ‘आयसीयू’मध्ये ठेवले होते. यावेळी रुग्णालयाच्या काही कर्मचाऱ्यांनी आयसीयूमध्येच महिलेवर सामूहिक बलात्कार केला. याप्रकरणी चार पुरुष आणि एका महिलेला ताब्यात घेतले असून, त्यांची चौकशी सुरू आहे अशी माहिती पोलिसांनी दिली. महिलेच्या पतीने केलेल्या आरोपानुसार, ‘पत्नीला आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते. तिला इंजेक्शन देत बेशुद्द करण्यात आले आणि तिघांनी मिळून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला आहे.’

‘महिलेला श्वसनाचा त्रास असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. महिलेने रविवारी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी आपल्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. बलात्कार झाला तेंव्हा आयसीयूमधील सीसीटीव्ही कॅमेरा बंद होता. याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, तपास करण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आली आहे. चार पुरुष आणि एका महिलेला ताब्यात घेण्यात आले असून, पुढील तपास करत आहोत, अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकारी हरिमोहन सिंग यांनी दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button