breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

आम्ही सर्वधर्म-समभाव याप्रमाणे वागत आलोय, जातीभेद मानत नाही – पार्थ पवार

– ख्रिश्नन धर्मगुरुना भेटल्याने ट्रोल करणा-यांना पार्थ पवारांचे प्रतिउत्तर

उरण ( महा ई न्यूज ) –  आमच्या मनात कुठला जातीभेद नाही, जातीपातीचे राजकारण आमच्याकडून कधीही होणार नाही. आम्ही सर्वधर्म समभाव याप्रमाणे वागत आलो आहोत. त्यामुळे चर्चमधल्या धर्मगुरुबद्दल काही आक्षेप असतील, त्यात माझी काय चूक, असा सवाल राष्ट्रवादी-काॅंग्रेस महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांनी केला. 

पार्थ पवार यांना दापोडीतील एका वादग्रस्त ख्रिश्चन धर्मगुरुकडे गेल्यामुळे ट्रोल झाले. त्यावर पार्थ पवार म्हणाले की, दररोज गाठीभेटी, प्रचार दाैरे सुरु असताना कार्यकर्त्यांच्या भावना, त्याचा मान राखून दापोडीतील चर्चमध्ये गेलो,  त्यावरुन मी ट्रोल झालो, मात्र, स्थानिक पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या भावना असतात त्यामुळं जावं लागतं. चर्चमधल्या धर्मगुरुबद्दल काही आक्षेप असतील, ते मला अजिबात माहीत नाहीत, असे त्यांनी सांगितले. 

पहिल्या भाषणाबद्दलही पार्थ पवार यांनी स्पष्टीकरण दिलं. पहिलं भाषण जरा नीट झालं नाही, पहिल्या प्रयत्नात असं होतंच. इंग्रजी माध्यमातून शिकलो म्हणून मराठी येत नाही असं नाही. सराव झाला की मराठी येतं. कितीतरी लोकांना भाषेचं ज्ञान नसतं, पण ते चांगलं काम करुन दाखवतात, असंही पार्थ पवार म्हणाले.

पवार कुटुंबात वाद असल्याचं भाजपकडून म्हटलं जातंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही याबाबत वक्तव्य केलं होतं. यावर पार्थ पवारांनी स्पष्टीकरण दिलं. आमच्या घरात काहीही वाद नाही. मलाही तिकिटासाठी खूप झगडावं लागलं. कार्यकर्त्यांची इच्छा होती मी निवडणूक लढवावी म्हणून निवडणुकीत उतरलो. तिकीट जाहीर झाल्यापासून आजोबांशी बोललो नाही. पण प्रचाराचा त्यांचं मार्गदर्शन असतं, असं पार्थ पवार म्हणाले.

तसेच घराणेशाही आम्हाला निश्चित मान्य नाही. पवारसाहेबांनी म्हटल्याप्रमाणं एकाच घरात किती तिकीटं देणार. राष्ट्रवादीत घराणेशाही आहे असं मला वाटत नाही, अशी प्रतिक्रिया पार्थ पवार यांनी दिली. शरद पवार यांनी पार्थला तिकीट देत असल्यामुळे आपण माढ्यातून माघार घेत असल्याचं सांगितलं होतं.

दरम्यान, पार्थ पवार हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चाहते आहेत. राज ठाकरे यांचा मी फॅन आहे आणि फॅन राहिल. मनसेचा आघाडीला नक्कीच फायदा होईल, असं पार्थ म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button