breaking-newsपुणे

आमदार रोहित पवार यांच्या हस्ते पारितोषिक वितरण

  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयातील पथनाट्य स्पर्धेचा समारंभ
  • डॉ. अरविंद बुरुंगले यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम होणार संपन्न


पुणे | महाईन्यूज | प्रतिनिधी

औंध येथील रयत शिक्षण संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन पथनाट्य स्पर्धेचा’ पारितोषिक वितरण समारंभ १ फेब्रुवारी रोजी महाविद्यालयात होणार असून आमदार रोहित पवार यांच्या हस्ते पारिषिक वितरण केले जाणार आहे.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आमदार रोहित पवार असतील. कार्यक्रमाचे अध्यक्ष एस. एम. जोशी महाविद्यालय हडपसरचे प्राचार्य डॉ. अरविंद बुरुंगले उपस्थित राहतील, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे, कार्यक्रमाचे संयोजक डॉ. संजय नगरकर व स्पर्धा समन्वयक सूर्यकांत सरोदे यांनी दिली.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून मराठी विभाग व विद्यार्थी मंच यांच्या वतीने ‘आंतरमहाविद्यालयीन पथनाट्य स्पर्धा’ घेण्यात आल्या. स्पर्धेत सहभागी २२ महाविद्यालयांपैकी प्रथम क्रमांकाचा ‘कर्मवीर फिरता करंडक’ सी. के. गोयल महाविद्यालय, दापोडी (रु. ५०००), द्वितीय क्रमांक पिंपरीतील महात्मा फुले महाविद्यालय (रु. ३००० व सन्मानचिन्ह), तृतीय क्रमांक एस. एम. सी. सी. कॉलेज (रु.२००० व सन्मानचिन्ह), उत्तेजनार्थ संघवी केशरी कॉलेज (रु. १००० व सन्मानचिन्ह), बालाजी लॉ कॉलेज (उत्कृष्ट संहिता – कशासाठी पोटासाठी), उत्कृष्ट कलावंत पुरुषपात्र- अबिर तिवारी, स्त्रीपात्र अमिषा सोंडे, आदी कलावंत व महाविद्यालयांनी पारितोषिके पटकवली आहेत.

सर्व स्पर्धकांना आमदार रोहित पवार व प्राचार्य डॉ. अरविंद बुरुंगले यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात येणार आहे. तरी, पुणे शहरातील सर्व महाविद्यालयातील कलावंत विद्यार्थ्यांनी या पारितोषिक वितरण समारंभासाठी उपस्थित रहावे, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे यांनी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button