breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

आमदार महेश लांडगे यांची गर्जना : एक ही नारा एक ही नाम… जय श्रीराम, जय श्री राम..!

– अयोध्येतील राम मंदिर भूमीपुजनानिमित्त रामभक्तांना आवाहन

पिंपरी । प्रतिनिधी

एक ही नारा… एक ही नाम… जय श्री राम… जय श्री राम…अशी गर्जना अयोध्येतील श्री राम मंदिर भूमिपुजनाच्या निमित्ताने पिंपरी-चिंचवड भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष आणि आमदार महेश लांडगे यांनी केली आहे. त्यानिमित्ताने शहर भाजपा पुन्हा एकदा एकवटली आहे.

अनेक दशांकपासून प्रलंबित असलेले श्री राम मंदिर अयोध्येतील राम जन्मभूमी येथे उभारण्यात येत आहे. त्याचा भूमिपुजन सोहळा बुधवारी, दि. ५ ऑगस्टरोजी होत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार असून, भारतीय जनता पार्टीसह देशभरातील सर्वच हिंदुत्त्ववादी पक्ष, संस्था, संघटनांनी हा उत्सव साजरा करण्याची तयारी केली आहे.

दरम्यान, श्रावण कृ. २, शके १९४२, बुधवार दिनांक ५ ऑगस्ट २०२० रोजी अभिजित मुहूर्तावर प्रभू श्रीरामचंद्रांच्या मंदिराचे भूमिपुजन होणार असून, हा दिवस आपल्यासाठी अत्यंत भाग्यशाली आणि आनंदाचा आहे. मागील शेकडो वर्षांत ज्यांनी श्री राम जन्मभूमीच्या मुक्तीसाठी प्रयत्न केले, बलिदान दिले त्यांचे स्मरण करण्याचा हा दिवस आहे, असे मत आमदार लांडगे यांनी व्यक्त केले.

***

शहरातील श्री राम भक्तांना आवाहन…

सर्व हिंदूंनी बुधवार, दि. ५ ऑगस्ट २०२० रोजी सकाळी आपल्या घरासमोर रांगोळी काढावी. सकाळी १० वाजता सामाजितक अंतर पाळून श्रीराम प्रतिमेचे पूजन करण्यास येणाऱ्या प्रत्येकाने मास्क लावणे बंधनकारक आहे. प्रत्येक घरात  श्रीरामरक्षा स्त्रोत्र म्हणावे. शक्य झाल्यास मोठ्या आवाजात घरात रामभजन लावावे, तसेच घराच्या छतावर भगवा ध्वज लावावा. पुरणपोळी, एखादा गोड पदार्थ किंवा साखरेचा नैवैद्य दाखवावा. संध्याकाळी ७ वाजता घरावर, छतावर, अंगणात विद्युत रोषणाई किंवा तेलाचे दिवे लावावेत, असे आवाहन श्री राम मंदिर भूमिपुजन सोहळ्यानिमित्त पिंपरी-चिंचवड भाजपाच्या वतीने शहरातील हिंदू बांधवांना आवाहन केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button