breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

आमदार जगतापांची पोलिसांना मदत, संपूर्ण चेहरा झाकणारे ७०० विशेष मास्क केले वाटप

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पोलिस बांधव कोरोना लढाईत धोका पत्करून काम करत आहेत. नागरिकांच्या संपर्कात आल्यामुळे काही पोलिसांना देखील कोरोनाची लागण होऊ लागल्याची प्रकरणे समोर येत आहेत. त्यामुळे पोलिसांना चांगली सुरक्षा साधने देण्याची आवश्यकता आहे. हीच बाब ओळखून आमदार लक्ष्मण जगताप हे पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या मदतीला धावून गेले आहेत. आमदार जगताप यांनी पोलिसांना संपूर्ण चेहरा झाकणाऱ्या विशेष मास्कची मदत दिली आहे. सुमारे ७०० विशेष मास्क पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाकडे सुपूर्त करण्यात आले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देश गेल्या २१ दिवसांपासून लॉकडाऊन आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा लॉकडाऊन ३ मेपर्यंत वाढविण्याची घोषणा केली आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत संचारबंदी घालण्यात आली आहे. नागरिकांनी घराबाहेर पडून एकमेकाच्या संपर्कात येऊ नये आणि त्यातून कोरोनाचा संसर्ग वाढू नये हा त्यामागचा उद्देश आहे. संचारबंदीची प्रभावी अंमलबजवाणी करण्याची पूर्ण जबाबदारी पोलिसांची आहे. त्याचप्रमाणे कोरोनाची लागण झालेल्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना शोधून काढणे, अशा नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य न केल्यास त्यांना उपचारासाठी वठणीवर आणण्याची जबाबदारी सुद्धा पोलिसांचीच आहे. त्यामुळे पोलिस बांधव डोळ्यात तेल घालून रात्रंदिवस रस्त्यावर काम करत आहेत.

हे जोखमीचे काम करत असताना काही पोलिस बांधवांनाही कोरोनाची लागण झाल्याची काही प्रकरणे समोर आली आहेत. आज अनेक पोलिस कर्मचारी मास्कअभावी तोंडाला रुमाल अथवा फडके तोंडाला बांधून कर्तव्य बजावत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून पोलिसांनी योग्य आणि चांगल्या दर्जाची सुरक्षा साधणे मिळणे गरजेचे आहे. हीच बाब ओळखून आमदार लक्ष्मण जगताप हे पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या मदतीला धावून गेले आहेत.

आमदार लक्ष्मण जगताप यांनी पिंपरी-चिंचवड पोलिसांना पूर्ण चेहरा झाकणाऱ्या विशेष मास्कची मदत केली आहे. मंगळवारी पोलिस आयुक्तालयात सुमारे ७०० विशेष मास्क पोलिस उपायुक्त श्रीधर जाधव यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले. यावेळी अमित पसरणीकर, गिरीश जाचक,धनंजय ढोरे, रोहित रसाळ, अमित पवार आदी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button