breaking-newsआंतरराष्टीय
आफ्रिका खंडात 18 दूतावास सुरू करणार – नरेंद्र मोदी
कांपाला (युगांडा) – भारत आफ्रिकेत 18 नवीन दूतावास सुरू करू करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युगांडाच्य संसदेत हे जाहीर केले आहे. युगांडाच्या संसदेत भाषण करणारे नरेंद्र मोदी हे भारताचे पहिलेच पंतप्रधान आहेत. आफ्रिकेत भारताची उपस्थिती अधिक मजबूत करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात येत आहे.
इदी अमीन यांच्या काळात युगांडातून घालवून देण्यात आलेल्या एशियन लोकांना पुन्हा युगांडात येण्यासाठी उत्तेजन देण्याच्या अध्यक्ष योवेरी मुझवेनी यांच्या भूमिकेची मोदींनी प्रशंसा केली आहे