breaking-newsपुणेमहाराष्ट्र

आपापसांतील मतभेद आणि नाराजी दूर करून एकसंघपणे काम करू – कॉंग्रेस शहराध्यक्ष रमेश बागवे

पुणे – आपापसांतील मतभेद आणि नाराजी दूर करून एकसंघपणे काम करू. तसेच पुण्यातील खासदारकीची जागा ही परंपरागत कॉंग्रेसचीच राहिली आहे आणि राहणार आहे, असे कॉंग्रेस शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत ठामपणे सांगितले.
पुण्यातील खासदारकीची जागा कॉंग्रेसला किंवा राष्ट्रवादीला मिळाली तरी एकत्रितपणे त्या उमेदवाराचे काम करू, असे नुकतेच दोन्ही पक्षाच्या शहराध्यक्षांनी सांगितले होते. मात्र आता हा आमचाच मतदार संघ आहे आणि आमचाच उमेदवार येथे उभा राहणार अशी भूमिका कॉंग्रेसने घेतली आहे. मात्र यासाठी उमेदवार कोण, याविषयी विचारले असता त्यांनी उत्तर देणे टाळले.
मागील वर्षापर्यंत आमचा चेहरा विश्वजीत कदम असे कॉंग्रेसजन म्हणत होते. मात्र कॉंग्रेसनेते पतंगराव कदम यांच्या मृत्युनंतर त्यांच्या जागी विश्वजीत कदम यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यामुळे पुण्यातील खासदारकीचा त्यांचा विषय मागे पडला. त्यामुळे आता कॉंग्रेसला नवा चेहरा शोधावा लागणार आहे. त्यामुळे तो चेहरा कोणता असेल याविषयी विचारले असता, त्याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील असे उत्तर बागवे यांनी दिले.
आम्ही केलेला विकास जनतेपर्यंत पोहोचवला नाही त्यामुळेच आम्हांला जनतेने नाकारले आहे, हे आम्ही आधीच मान्य केले आहे. त्यामुळे जनतेपर्यंत पुन्हा पोहोचण्यासाठी तळागाळातून प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी मतभेद, नाराजी दूर करून जुन्या कार्यकर्त्यांनाही एकत्र आणले जात जात असल्याचे बागवे यांनी नमूद केले.
………………………
कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांची सभा जून अखेर पर्यंत घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे बागवे यांनी सांगितले. पक्ष कार्यकर्त्यांचे शिबिर जूनच्या पहिल्या आठवड्यात होईल. त्याआधी बुथ कमिट्या, विधानसभा मतदार संघनिहाय मेळावे होणार असल्याचे बागवे यांनी नमूद केले.
…………………………………..
भाजप सरकारला केंद्रात सत्ता स्थापन करून चार वर्षे झाली आहेत. या चार वर्षांच्या काळात भाजप सरकारने जनतेलाच फसवण्याचे काम केल्याचा आरोप करून, त्यांच्या विरोधात 27 मे रोजी मोर्चा काढण्यात येणार असल्याचे बागवे यांनी सांगितले.
यावेळी बाळासाहेब शिवरकर, मोहन जोशी, दीप्ती चवधरी हे आमदार, माजी शहराध्यक्ष ऍड. अभय छाजेड आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते. सकाळी साडेदहा वाजता मंडई येथील टिळक पुतळा ते स्वारगेट येथील जेधे पुतळा असा हा मूक मोर्चा काढण्यात येणार असल्याचे बागवे म्हणाले

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button