breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमुंबई

आपल्याला शाहू, फुले, आंबेडकरांची विचारधारा घेऊन पुढे जावू या – शरद पवार

मुंबई – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांचा आज १२ डिसेंबर रोजी ८० वा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने वाय. बी. चव्हाण सेंटर येथे विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावेळी अनेक कार्यकर्ते, दिग्गजांकडून त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी फोनवरून शरद पवार यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

पक्षाकडून झालेल्या स्वागतानंत शरद पवार यांनी मनोगत व्यक्त करत राज्यातील जनेतेचे आभार मानले. शरद पवार म्हणाले की, गेली ५-५० वर्ष राज्यात मी तुमच्या सर्वांसमोर आहे. ५० वर्षे काम करण्याची संधी राज्यातील जनतेने दिली. त्यासाठी मी राज्यातील जनतेचे आभार मानतो. महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांनी साथ दिली म्हणून इथंपर्यंत येता आलं.

सामूहिक कष्ट केले तर समाज पुढे जातो. तुमचा मार्ग कोणता असला पाहिजे, याबद्दलची समज आपल्यात पाहिजे, असेही ते म्हणाले. शरद पवार म्हणाले, महाराष्ट्रातील जनतेनं काम करण्याची संधी दिली. जीवनामध्ये विचारधारा जपणं अत्यंत महत्त्वाचं आहे. देशात भक्कम व्यवस्था डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यघटनेमुळे मिळाली. आपल्याला शाहू, फुले, आंबेडकरांची विचारधारा घेऊन पुढे जावं लागेल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button