breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

आपत्कालीन परिस्थितीत हलगर्जीपणा भोवला ; दोन उपअभियंत्याची सेवा निलंबित

पाणीपुरवठा व जलनिःसारणचे किशोर महाजन, ग क्षेत्रीय कार्यालयाचे विजयकुमार काळेंवर कारवाई

पिंपरी – मुसळधार पावसामुळे थेरगांवमध्ये रहदारीच्या रस्त्यामध्ये पावसाचे पाणी, सांडपाणी साठल्याने स्थानिक नागरिकांना, सोसायटीमधील नागरिकांना आणि वाहतूकीला मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होवून आपत्कालिन परिस्थिती निर्माण झाली होती. तसेच तेथील नागरिकांच्या जिवितास धोका निर्माण झाला होता. त्याप्रसंगी महापालिकेच्या आयोजित बैठकीस पाणी पुरवठा व जलनिःसारण विभागाचे उपअभियंता किशोर महाजन, ग क्षेत्रीय कार्यालय स्थापत्य विभागाचे विजयकुमार काळे हे गैरहजर राहिल्याने त्यांच्यावर सेवानिलंबित करण्याची कारवाई महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी केली.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका ग क्षेत्रीय कार्यक्षेत्रात गुरुवारी (दि.21) मुसळधार पावसाने थेरगांव परिसरात रहदारी रस्त्यामध्ये पावसाचे पाणी, सांडपाणी साठल्याने स्थानिक, सोसायटी नागरिकांना आणि वाहतूकीला मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होवून आपत्कालीन परिस्थिती उद्भवली, तेथील पाणीपुरवठा, जलनिःसारण व स्थापत्य विषयक कामाची जबाबदारी उपअभियंता किशोर महाजन आणि उपअभियंता विजयकुमार काळे यांच्यावर आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्तांच्या दालनात आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठक आयोजित करण्यात आली.

दरम्यान, त्या आपत्ती व्यवस्थापन बैठकीला वरिष्ठांना कोणतीही पुर्वसुचना अथवा समंती न घेता विनापरवाना गैरहजर राहिले. त्यांना दुरध्वनीवरुन संपर्क साधला असता त्यावर कोणताही प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे संबंधित उपअभियंता किशोर महाजन, विजयकुमार काळे या दोन्ही अधिकारी आपल्या पदाची जबाबदारी व कर्तव्ये ज्ञात असणे आवश्यक आहे. विनापरवाना गैरहजेरीमुळे आपत्ती व्यवस्थापन तसेच पाणी पुरवठा, जलनिःसारण अत्यावश्यक सेवेत अडथळा निर्माण होवून नागरिकांच्या जिवितास धोका निर्माण झाला. त्या संबंधित अधिकारी जबाबदार असल्याचा अहवाल विभाग प्रमुख ग क्षेत्रीय कार्यालय सादर केलेला आहे. त्या अधिका-यांनी केलेल्या अशोभनिय गैरवर्तनाबाबत आणि विभाग प्रमुखांनी दिलेल्या अहवालानूसार महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) तत्काळ सेवानिलंबित करण्यात आले आहे. तसा आदेश महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी दिला आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button