breaking-newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

आधी मोदींना हटवा, एका आदिवासी महिलेची शरद पवारांकडे साद

  • खचून न जाता लोकांच्या मनात राष्ट्रवादीचे विचार रुजवा
  • शरद पवार यांनी दिला पराभूत उमेदवारांना मानसिक आधार

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

मी नाशिकला गेलो तेव्हा एक आदिवासी महिला म्हणाली की, आधी मोदींना हटवा. सांगण्याचे तात्पर्य की, सरकारविषयी लोकांच्या मनात असंतोष आहे. त्यांना विश्वास आहे की आपणच ही परिस्थिती हाताळू शकतो. शेतकरी आणि गरीब घटकांत सरकारविरोधात प्रचंड नाराजी आहे. त्यामुळे कडवी झुंज देऊनही पराभूत झालेल्या उमेदवारांनी खचून जाता पुन्हा जोमाने पक्षाचे काम करावे, असा सल्ला राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांना दिला.

विधानसभा निवडणुकांमध्ये कडवी झुंज देऊनही यश संपादन करू न शकलेल्या उमेदवारांशी संवाद साधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी ज्येष्ठ सहकारी नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मुंबई प्रदेश कार्यालयामधील एका बैठकीमध्ये पाचारण केले होते. यावेळी पक्षाचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

शरद पवार म्हणाले की, अनेकांना राज्याच्या विधानसभा निवडणुकीत यश आलं नाही, त्याला बरीच कारणं आहे. आपली साधनसामग्री कमी पडली. सत्ताधाऱ्यांकडे दिल्ली व राज्याची जबरदस्त ताकद होती. त्यामुळे आपल्याला पराभव पत्करावा लागला. जे जिंकले त्यांनी आवाक्याबाहेर मेहनत केली आणि विजय मिळवला. अनेक ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकदिलाने लढले. निवडणुकीच्या काळात तरुण पिढीची साथ आपल्याला मोठ्या प्रमाणात मिळाली. अल्पसंख्याक समाजानेही आपल्याला साथ दिली. काही झाले तरी भाजपला निवडून आणायचे नाही, अशी मनस्थिती होती.

अनेकांनी वंचितने नुकसान केले असे सांगितले. समाजातील गरीब वर्ग वंचितच्या माध्यमातून संघटित झाला आहे. आंबेडकरांना मानणारा हा वर्ग आहे. आतापर्यंत हा वर्ग आपल्या सोबतच होता. काही कारणाने हा समाज आपल्यापासून दुरावला गेला. हा समाज आपल्या सोबत कसा येईल त्यासाठी आपल्याला काम करावे लागेल. संपूर्ण राज्यात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या कठीण प्रसंगी आपण त्यांना धीर देण्यासाठी बांधावर गेले पाहिजे. मी नाशिकला गेलो तेव्हा एक आदिवासी महिला म्हणाली की आधी मोदींना हटवा. हा असंतोष लोकांच्या मनात आहे. त्यांना विश्वास आहे की आपणच ही परिस्थिती हाताळू शकतो. शेतकरी आणि गरीब घटकांत सरकारविरोधात प्रचंड नाराजी आहे. काही ठिकाणी संघटनात्मक कामात आपण कमी पडलो. शहरांमध्ये आपल्या जागा कमी आल्या. एकेकाळी शहरांमध्ये आपली ताकद होती. या सगळ्यांवर मात करत आपल्याला पुढे जायचं आहे. निवडणुकीत यश आलं नाही तरी तुमच्यावर येत्या काळात महत्त्वाची जबाबदारी टाकली जाईल. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विचार तुम्हाला जनतेच्या मनात रुजवायचे आहेत. त्यामुळे आपण कामाला लागले पाहिजे.”

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, “राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला विधानसभा निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात यश प्राप्त झाले आहे. राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी सरकारमधील मंत्र्यांना चितपट केले. मात्र पक्षाच्या काही उमेदवारांना पराभव पत्करावा लागला. पराभव झालेल्या उमेदवारांनी खचून जावू नये. आपण ताकदीने पुन्हा लढू. शरद पवार यांचा आदर्श पराभूत झालेल्या उमेदवारांनी ठेवावा. वयाच्या ८०व्या वर्षी पवार यांनी सत्ताधाऱ्यांविरोधात लढा दिला. अहंकारी भाषा करणाऱ्यांचा अहंकार मोडला. याच उर्जेने पराभूत झालेल्या उमेदवारांनी लढावे.”

अरे ओ सांभा कितने आदमी थे… एक ही था, म्हणण्याची मुख्यमंत्र्यांवर वेळ

खासदार श्रीनिवास पाटील व आ. छगन भुजबळ यांनीही सभेला मार्गदर्शन केले. भुजबळ म्हणाले की, “आयुष्यात जय पराजय येतच असतो. त्यामुळे खचून जायचे नाही. आपण लढाईसाठी सज्ज झालंच पाहिजे. तळापर्यंत तुम्ही जा, संघटन नव्याने तयार करा, माणसांना जोडा. निवडणुकीत हवा असते, यावेळी ती आपल्या बाजूने होती. सर्वांना वाटलं होतं आता विरोधक नाही, मुख्यमंत्री खिल्ली उडत होते. मात्र, जनतेने त्यांना ट्रोल केले. मुख्यमंत्र्यांना शोले पिक्चरचा डायलॉग सूट होतो, अरे सांबा कितने आदमी थे, एकही था… शरद पवार! पवारसाहेबांसोबत लोक सेल्फी काढण्यासाठी उत्सुक असतात. अगदी शहरी भागातही आपल्या बाजूने वातावरण आहे. हिमतीने काम घ्या.”

विधिमंडळ पक्षनेते अजित पवार म्हणाले की, “तुम्ही जिद्दीने संघर्ष केला. कडवी झुंज दिली. सर्वांचं मनापासून कौतुक. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येक उमेदवाराचा जय किंवा पराजयही सन्मानपूर्वक आहे, याचा अभिमान वाटतो.”

स्टार प्रचारक अमोल मिटकरी म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसाठी अनुकूल वातावरण आहे. आपण असेच काम केले तर नक्कीच २०२४ साली राष्ट्रवादी एक नंबरचा पक्ष असेल.”

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button