राष्ट्रिय

आधारला मागे टाकण्यासाठी गुगल, स्मार्टचे प्रयत्न

नवी दिल्ली – युनिक आयडेंटिफिकेशन अॅथोरिटी ऑफ इंडियाने (यूआयडीएआय) मंगळवारी (दि.१७) आधार कार्डच्या गुप्ततेसंबंधी सर्वोच्च न्यायालयात एक धक्कादायक दावा केला आहे. नागरिकांना युनिक आयडेंटिटी मिळू नये व आधार कार्ड योजना अयशस्वी ठरावी, यासाठी गुगल आणि स्मार्ट कार्ड प्रयत्न करत असल्याचा आरोप यूआयडीएआयने केला आहे.

यूआयडीएआयचे वरिष्ठ अधिवक्ता राकेश द्विवेदी यांनी सांगितले, की युरोपमधील एका व्यावसायिक कंपनीने आधार कार्डचा वापर स्मार्ट कार्डप्रमाणे केला जाऊ नये म्हणून एक अभियान सुरू केले आहे. जर आधार यशस्वी झाले तर स्मार्ट कार्ड व्यवसायातून बाहेर होईल. त्यामुळे गुगल आणि स्मार्ट कार्ड लॉबीला आधार यशस्वी करायचे नाही. त्यामुळेच त्यांच्याकडून आधारवर आरोप केले जात असल्याचे ते म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button