breaking-newsपुणेमहाराष्ट्र

आता हॉकर्सवर राहणार कॅमेऱ्यांचे वॉच

  • आता हॉकर्सवर राहणार कॅमेऱ्यांचे वॉच
    पुढच्या आठवड्यापासून धडक कारवाईला सुरूवात

पुणे  – “हॉकर्स पॉलीसी’ अंतीम टप्प्यात आहे. ती लागू होण्यापूर्वी महापालिका प्रशासनाने तयारी सुरू केली असून, ज्या ठिकाणी “नो हॉकर्स झोन’ आहेत त्या ठिकाणी कॅमेऱ्याचा वॉच ठेवण्यात येणार आहे. यासाठी पोलीसांकडून तसेच महापालिकेने विविध रस्त्यांवर लावलेल्या कॅमेऱ्याचा उपयोग करून घेण्यात येणार आहे. यामुळे ठरवून दिलेल्या ठिकाणी न बसता “नो हॉकर्स झोन’ मध्ये येणाऱ्या विक्रेत्यांवर थेट कारवाई करता येणार आहे.

शहरात विखुरलेल्या पथारी व्यावसायिकांसाठी महापालिका प्रशासनाने हॉकर्स पॉलिसी बनवून 45 रस्ते आणि 153 चौकांमध्ये त्यांच्या पुनर्वसनाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार काही ठिकाणी जागा आहेत तर काही ठिकाणी ओटा मार्केट बनवण्यासाठी जागापाहणी सुरू आहे.
ही तयारी पूर्ण झाल्यानंतर लॉटरी पद्धतीने या व्यावसायिकांना जागा वाटप करण्यात येणार आहे.
ज्या ठिकाणी नोहॉकर्स झोन आहेत त्या भागात बसवलेल्या कॅमेऱ्यांचा वॉच त्यांच्यावर असणार आहे. अतिक्रमण झाल्यास त्यांच्याअर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच कारवाई सहभागी वाहनांना जीपीआरएस प्रणाली बसवण्यात येणार आहे.
सद्यस्थितीत महापालिकेने धानोरी येथील राजमाता भाजी मंडईमध्ये बांधलेल्या 105 ओट्यांवर त्याच परिसरातील व्यावसायीकांचे पुर्नवसन करण्यासाठी हरकती आणि सूचना मागविल्या आहेत. लवकरच सिंहगड रस्त्यावरील सनसिटी, वडगाव शेरी, हडपसर आणि कळस येथील पुर्नवसनासाठीची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. याबाबत महापालिकेच्या अतिक्रमण नियंत्रण विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांनी माहिती दिली.
महापालिकेच्या वतीने धानोरी येथे ओटा मार्केट बांधण्यात आले आहे. याठिकाणी 105 ओटे बांधण्यात आले असून, या परिसरात महापालिकेकडे नोंदणी असलेले 122 पथारी व्यावसायिक आहेत. ओटे वाटपासाठी लॉटरी पद्धतीचा अवलंब करण्यात येणार आहे. यासाठी हरकती सूचना मागविल्या आहेत. यानंतर कळस, वडगाव शेरी, हडपसर आणि सिंहगड रस्त्यावरील सनसिटी येथे बांधण्यात आलेल्या भाजी मंडईमधील ओटे आणि गाळ्यांच्या वाटपासाठी हरकती-सूचना मागविण्यात येणार आहेत, जगताप म्हणाले.

अनधिकृतरित्या पथारी व्यवसाय करणाऱ्यांवर पुढील आठवड्यापासून कारवाईला सुरूवात
अनधिकृतरित्या पथारी व्यवसाय करणाऱ्यांवर पुढील आठवड्यापासून कारवाईला सुरूवात करण्यात येणार आहे. 30 गाड्यांचा ताफा यासाठी सज्ज करण्यात येणार असून, यासाठी 15 जणांचे स्वतंत्र स्क्वाड नियुक्त करण्यात आले आहे. 15 क्षेत्रीय कार्यालयांतर्गत 15 गाड्या आणि अन्य कारवाईसाठी 15 असा गाड्यांचा ताफा असणार आहे.

स्वत:च्या नावचा गाळा भाडेतत्त्वावर कोणाला दिला असेल किंवा एखाद्या मदतनीसाला बसवून व्यवसाय सुरू असेल अशा स्टॉलधारकांवरही कारवाईला सुरूवात करण्यात येणार आहे. स्टॉलचा असा गैरवापर दिसल्यास जागेवर परवाना रद्द करण्याची कारवाई करण्यात येणार असल्याचे अतिक्रमण नियंत्रण विभागप्रमुख माधव जगताप यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button