breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

आता बीएमसी कर्मचाऱ्यांनाही पाच दिवसांचा आठवडा लागू होणार

राज्यातील सरकारी कार्यालयांनंतर आता मुंबई महानगर पालिकेतील कर्मचार्यांनाही पाच दिवसांचा आठवडा लागू करण्यात येणार आहे. यासंदर्भात परिपत्रक काढण्यात आले असून यावर आता केवळ आयुक्तांची स्वाक्षरी होणे बाकी आहे. आयुक्तांची स्वाक्षरी होताच पालिकेतील कर्मचाऱ्यांना देखील राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे पाच दिवसांचा आठवडा लागू करण्यात येईल.

महाविकास आघाडी सरकारने काही दिवसांपूर्वीच राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसदर्भात पाच दिवसांचा आठवडा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता. महापालिकेच्या कामगार विभागाने या संदर्भातील परिपत्रक प्रसिद्ध केल असून त्यावर आता पालिका आयुक्तांची स्वाक्षरी होण्याची औपचारिकता बाकी आहे. प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकानुसार अत्यावश्यक सेवा वगळून कार्यालयीन कामकाज करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पाच दिवसाचा आठवडा लागू करण्यात येणार आहे.

ज्या कर्मचाऱ्यांना आधी दुसरा आणि चौथा आठवडा सुट्टीचा फायदा मिळत होता अशाच अधिकारी कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे शनिवार आणि रविवार या दिवशी पालिकेचे मुख्यालय आणि इतर प्रशासकीय कार्यालये बंद राहतील. पाच दिवसांचा आठवडा लागू झाल्यावर पालिका कर्मचारी अधिकाऱ्यांना सोमवार ते शुक्रवार सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५ पर्यंत काम करावे लागेल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button