breaking-newsआंतरराष्टीय

आता फेस्बुक्च्या पोस्ट व्हॉट्सअॅपवर शेअर करता येणार

नवी दिल्ली: आपल्या मोबाइल अॅपसाठी फेसबुक नवीन फीचरची चाचणी करत आहे. या नवीन फीचरद्वारे यूजर्स फेसबुक पोस्टमधील मजकूर व्हॉट्सअॅपवरही शेअर करू शकतील, असे वृत्त आहे. फेसबुकचे बिटा व्हर्जन वापरणारे काही यूजर्स हे नवीन फीचर फेसबुक अॅपवर सध्या वापरत आहेत. मात्र, फेसबुक किंवा व्हॉट्सअॅपनं अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

फेसबुक अॅपवर ‘शेअर’ बटनावर टॅप केल्यानंतर तुम्हाला ‘शेअर नाऊ’, ‘राइट पोस्ट’ आणि ‘सेंड इन व्हॉट्सअॅप’ असे तीन पर्याय दिसतील. जर फेसबुकवरून मजकूर, छायाचित्र अथवा व्हिडिओ व्हॉट्सअॅपवर शेअर करायचा असेल तर शेअर मेन्यूवरून ‘सेंड इन व्हॉट्सअॅप’ हा पर्याय निवडावा लागेल. त्यानंतर एक लिंक तयार होईल. ती लिंक तुम्हाला व्हॉट्सअॅपवर शेअर करता येऊ शकते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button