breaking-newsपुणेमहाराष्ट्र

आता दहावी, बारावीचे हॉलतिकिटेही ऑनलाईन

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आला महत्वपूर्ण निर्णय 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे हॉलतिकिट विद्यार्थ्यांना या वर्षांपासून ऑनलाइन मिळणार आहे. हा महत्त्वपूर्ण निर्णयास पुणे विभागीय मंडळात हॉलतिकिट ऑनलाइन दिल्याचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर करण्यात आला.

संपूर्ण राज्यातील दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचा या निर्णयामुळे त्रास कमी होणार असून माध्यमिक शाळा, ज्युनिअर कॉलेजांमध्ये परीक्षेच्या काळात फेरे मारण्याची गरज नाही. मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी हॉलतिकिट ऑनलाइन देण्याचा महत्वपूर्ण निर्णय बद्दल संपूर्ण माहिती वृत्तसंस्था दिली.
या निर्णयामुळे शाळा, महाविद्यालयांनी परीक्षेची ऑनलइन हॉलतिकिट प्रिंट करून विद्यार्थ्यांना द्यावयाची असून त्यासाठी कोणत्याही पद्धतीचा शुल्क आकारू नये असे त्याचप्रमाणे हॉलतिकिटमध्ये  विषय बदल माध्यम बदल असेल तर त्याची दुरुस्ती विभागीय मंडळाकडे जाऊन करता येणार आहे. असे सूचनापत्रात म्हटले आहे, मात्र हॉलतिकिट ऑनलाइन मिळण्याचे संकेस्थळ आणि तारीख नंतर कळवण्यात येणार असल्याचे मंडळाकडून सांगण्यात आले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button