breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

आज दशकातील पहिला अर्थसंकल्प; सर्वांचे लक्ष घोषणांकडे

नवी दिल्ली – कोरोना महामारी आणि लॉकडाऊनमुळे मंदावलेली अर्थव्यवस्था, घसरलेला विकासदर, बेरोजगारीचा गंभीर प्रश्न या पार्श्वभूमीवर आज मोदी सरकार आपल्या दुसऱ्या पर्वातील तिसरा आणि दशकातील पहिला अर्थसंकल्प सादर करणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन सकाळी 11 वाजता सर्वसाधारण अर्थसंकल्प संसदेत सादर करतील. कोरोनामंदीतून सावरण्याबरोबरच भारतीय अर्थव्यवस्थेला नवी गती देण्यासाठी आणि त्याचवेळी देशातील नागरिकांना आर्थिकदृष्ट्या तणावमुक्त करण्यासाठी केंद्राकडून नेमकी कोणती पावलं उचलली जातील, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

यंदाच्या वर्षी अर्थसंकल्पीय अधिवेशन हे दोन भागांमध्ये पार पडणार आहे. ज्यापैकी पहिला टप्पा 29 जानेवारी ते 15 फेब्रुवारी यादरम्यान पार पडणार असून दुसरा टप्पा 8 मार्च ते 8 एप्रिल या काळात पार पडणार आहे. याचदरम्यान निर्मला सीतारमण या केंद्रीय अर्थमंत्री म्हणून देशाचा आर्थसंकल्प आज, 1 फेब्रुवारीला सादर करतील. निर्मला सीतारामन यांचाही हा तिसरा अर्थसंकल्प आहे.

दरम्यान, कोरोना महामारीचा मोठा फटका अनेक क्षेत्रांना बसला. अनके लघु, सूक्ष्म आणि मध्यम उद्योग बंद पडले. कित्येक उद्योगांचे अर्थकारण पूर्णपणे रुळावर आलेले नाही. मात्र या सर्वांमध्ये शेतीक्षेत्र हे एकमेव असे क्षेत्र आहे, ज्या क्षेत्राला कोरोनाचा कोणताही प्रत्यक्ष फटका सहन करावा लागला नाही. कोरोना काळात शेती क्षेत्राने चांगली झेप घेतल्याचे दिसले. तरीसुद्धा कृषी क्षेत्राची हीच घोडदौड कायम ठेवण्यासाठी सरकार यावेळी शेती क्षेत्रासाठी विशेष तरतूद करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच देशभरात नव्या कृषी कायद्यांना होत असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर आज अर्थसंकल्पात शेती आणि शेतकऱ्यांसाठी नेमकं काय असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्याचबरोबर भारतात सध्या कोरोना लसीकरणाचा कार्यक्रम राबवला जातोय. मात्र कोरोना संसर्ग अजूनही पूर्णपणे थांबवता आलेला नाही. त्यामुळे कोरोनाला रोखण्यासाठी देशात होत असलेले लसीकरण आणि सामान्य नागरिकांचे आरोग्य लक्षात घेऊन यावेळी सरकार आरोग्य क्षेत्रासाठी काय तरतूद करणार याकडे लक्ष आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button