breaking-newsताज्या घडामोडीपुणे

आजीच्या गर्भाशायातून नातीचा जन्म

पुणे – प्रत्यारोपण केलेल्या गर्भाशयातून देशातील पहिल्या चिमुकलीचा दसऱ्याच्या शुभ मुहुर्तावर जन्म झाला. जगातील हे बारावे बाळ ठरले आहे. विशेष म्हणजे जन्माला आलेली मुलगी तिच्या आजीच्या गर्भाशयातून जन्माला आली आहे. म्हणजे जन्म दिलेल्या आईला तिच्या आईने आपले गर्भाभय दिले होते. त्यामुळे ही जननप्रकिया पार पडली. जन्मलेलं बाळ आणि तिची आई सुस्थितीत आहे.

पुण्यातील गॅलेक्सी केयर हॉस्पिटलमधे या मुलीचा जन्म झाला आहे. तिचे वजन 1450 ग्राम असून आई आणि तिची तब्येत ठणठणीत आहे. मीनाक्षी बालंद (28 वर्षे) असे आईचे नाव असून त्या बडोदा येथील आहेत. लग्नानंतर विविध कारणामुळे त्यांचा तीनवेळा गर्भपात झाला होता. त्यातच त्यांचे गर्भाशय निकामी झाल्याने पुन्हा आई होण्याची त्यांची आशा मावळली होती. पण, आई होण्याची आस त्याना स्वस्थ बसू देत नव्हती. त्यांना मूल दत्तक घेणे व सरोगासीचा पर्याय होता. पण, त्यानी ते नाकारुन गर्भाशय प्रत्यारोपण करण्याचा निर्णय घेतला. मुलीची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांची आई सुशीलाबेन (वय 48) यांनी आपले गर्भाशय देण्याची तयारी दर्शवली. त्यानुसार 17 मे 2017 रोजी प्रत्यारोपण करण्यात आले, अशी माहिती गॅलेक्सीचे वैद्यकीय संचालक डॉ. शैलेश पुनताम्बेकर यांनी दिली.

प्रत्यारोपित गर्भाशय व्यवस्थित काम करू लागल्याने प्रयोगशाळेत तयार केलेला गर्भ मार्च महिन्यात गर्भाशयात सोडण्यात आला. गर्भधारणाही  यशस्वीपणे झाली. तेव्हापासून मीनाक्षी या रुग्णालयातच आहेत. आई व बाळाच्या प्रत्येक हालचालीवर डॉक्टर लक्ष ठेउन होते. बुधवारी रात्री गर्भाशायातील पाण्याची पातळी कमी होत चालल्याचे निदर्शनास आल्याने तातडीने सिझेरिन करण्याचा निर्णय घेण्यात आला. अखेर रात्री 12 वाजून 12 मिनिटांनी गोंडस मुलीचा जन्म झाला. ज्या गर्भाशयातून तिच्या आईचा जन्म झाला, त्याच गर्भाशयातून तिचाही जन्म झाला आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button